नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार येताच परतूर शहरात प्राधान्याने 05 कोटी रुपयांचा निधी रस्ते विकासासाठी आणल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सन्मित्र कॉलनी परतूर येथे बोलताना सांगितले
ते सन्मित्र कॉलनी येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून परतूर शहराच्या अंतर्गत रस्त्यांसाठी आणलेल्या सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की मी मंत्री असताना परतुर शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला शहरात रस्ते विकास करताना 22 कोटी रुपयांची रस्ते बांधणी केली हे करत असताना शहरातील 28 नवीन ट्रान्सफर बसवण्याचे काम करण्याबरोबरच मुख्य रस्त्यावर गंजलेले विजेचे खांब बदलण्याचं काम त्याचबरोबर शहरांमध्ये बंच केबल टाकून घेण्याचं काम आपण केला असल्याचे यावेळी बोलताना ती म्हणाले
आपण नियमितच नगरपालिकेची सत्ता जरी विरोधकाकडे असली तरी परतूर शहरातील नागरिकांच्या विकासासाठी सदैव प्रयत्न केलेला असून शहराच्या सौंदर्यात आणि सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी उच्च दर्जाचे नाट्यगृह या ठिकाणी मंजूर करत असतानाच मराठवाड्यातील सर्वात भव्य दिव्य असे नाट्यगृह लवकरच परतूरकरांच्या सेवेमध्ये रुजू होईल, त्याचबरोबर परतुर शहरातील रेल्वे गेटवर नियमित गेट बंद झाल्यानंतर रहदारीचा प्रश्न निर्माण व्हायचा 43 कोटी रुपयांचा उड्डाणपूल आपण मंत्री असताना मंजूर करून आणला त्याचा कामाचा पूर्णत्वास जात असून लवकरच तो फुल रहदारीसाठी खुला होईल हे करत असतानाच परतूर शहरातील स्मशानभूमी ची अवस्था अतिशय बिकट होती या स्मशानभूमीच्या विकासासाठी भरभरून निधी आणत तीन कोटी रुपये खर्च करून परतूर शहरातील मोंढा भागातील आणि गाव भागातील स्मशानभूमीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचं काम आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये आपण केला असल्याचे यावेळी बोलताना आवर्जून बबनराव लोणीकर यांनी सांगितले
गेल्या वेळी भारतीय जनता पार्टीने परतूर नगरपालिकेसाठी कंबर कसून पालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यावेळी अतिशय थोड्या मताने आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले मात्र आपण केलेल्या विकास कामावर येणाऱ्या नगरपालिकेमध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा नगरअध्यक्ष परतुर पालिकेत बसेल असा विश्वास यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला
पुढे बोलताना ते म्हणाले की खरे तर परतूर हे शहर ऐतिहासिक शहरातून या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे पेशव्यांनी दिल्लीकडे कूच करताना या शहरांमध्ये मुक्काम केला होता तेच खलबत्त झाली होती या ऐतिहासिक शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक वेळा परतुर नगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीकडे द्या असे आवाहन यावेळी त्यांनी बोलताना नागरिकांना केली
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परतुर शहरातील क्रीडाप्रेमी साठी क्रीडांगणाची उपलब्धता नव्हती अत्याधुनिक सुविधेचे क्रीडांगण आता साकारत असून लवकरच त्याचेही काम पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून इंदोर स्टेडियम मध्ये मुलं कशी खेळतील यासाठी आपले प्रयत्न असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे ते म्हणाले येणाऱ्या काळामध्ये परतुर शहरातील प्रत्येक रस्ता स्वच्छ सुंदर कसा बनवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार असून शहरात येणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक शौचालयाची कुठेही व्यवस्था नाही ती व्यवस्था करून देण्याचे काम भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर प्रथम करेल असे यावेळी बोलताना ते म्हणाले पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये विरंगुळ्यासाठी एकही उद्यान अथवा गार्डन नाही शहरातील नागरिकांना मुलांना आभाळ वृद्धांना विरंगुळा मिळवून देण्यासाठी उद्यानाची कल्पना आपल्या डोक्यात असून पालिकेची सत्ता हाती दिल्यास निश्चितपणानं शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थिताना दिली यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे ता अध्यक्ष रमेश भापकर, रंगनाथ येवले दिनेश शेठ होलानी नगरसेवक सुधाकर सातोनकर नगरसेवक संदीप बाहेकर, नगरसेवक प्रकाश चव्हाण नगरसेवक कृष्ण आरगडे संपत टकले शत्रुघ्न कणसे प स सदस्य दिगंबर मुजमुले दया काटे प्रकाशराव दीक्षित श्रीरंगराव जईद, प्रवीण सातोनकर किशोर कद्रे विशाल पवार मंगेश वाघमारे सरफराज कायमखानी मलिक कुरेशी मुज्जू कायमखानी प्रमोद राठोड सोपान जईद प्रल्हादराव दवणे बाळू आढे अर्जुन राठोड प्रकाश अंभोरे दीपक कुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश