मंठा येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन,मंठा व परतूर येथे अनुक्रमे 15 - 15 कोटी रु ची क्रीडा संकुल
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या माध्यमातून मतदार संघासह जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय जागतिक पातळीपर्यंत न्यावे असा सल्ला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी खेळाडूंना दिला
ते मंठा येथे आयोजित क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मतदार संघातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळावे यासाठी आपण मंत्री असताना अनुक्रमे मंठा व परतुर येथे अद्यावत अशी क्रीडा संकुल मंजूर करून घेतली होती साकारत असलेल्या क्रीडा संकुला साठी 15 - 15 कोटी चा निधी मिळवून दिला त्यापैकी मंठा येथील क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात असून परतुर येथील क्रीडा संकुलाचा ही प्रश्न लवकरच मार्गी लागेल या माध्यमातून अतिशय उच्च सुविधा ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध होणार असून राष्ट्रीय राज्य पातळीवर पात्र होण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था या क्रीडा संकुल मध्ये असल्यामुळे निश्चित प्रमाणे मतदारसंघातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपला नावलौकिक करतील असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला
मंठा येथे साकारत असलेल्या क्रीडा संकुलमध्ये इनडोअर हॉल मध्ये होलीबॉल, बॅडमिंटन, खो खो रांगोळी, लांब उडी उंच उडी जलतरण तलाव ( स्वीमींग पूल) रेसिंग आदी अद्यावत सुविधा मुला मुली साठी उपलब्ध असणार आहेत त्या मुळे ग्रामीण भागातील मुलांना खऱ्या अर्थाने क्रीडा व्यासपीठ मिळणार असल्याचे या वेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
विकासाचा समतोल साधताना आपण शेतकरी कष्टकरी यांच्याबरोबरच युवकांच्या हिताचा विचार करत क्रीडा संकुल असतील किंवा सांस्कृतिक भूक भागवण्याचे साधन नाट्यगृह असेल अशा प्रकारच्याच विविध स्तरातील युवा युवती ना याचा मोठा फायदा होणार असल्याचे ही या वेळी बोलताना आमदार लोणीकर यांनी नमूद केले.
याप्रसंगी कार्यक्रमास अरविंद विद्यासागर जिल्हा क्रीडा अधिकारी व रेखा परदेशी तालुका क्रीडा अधिकारी व जालना जिल्ह्याची भाजपाचे उपाध्यक्ष गणेशराव खवणे, तालुका अध्यक्ष सतीश राव निर्वळ, राजेश मोरे, विठ्ठल मामा काळे, प्रसादराव बोराडे, के.जी राठोड सर. एन डी दवणे, प्रसाद राव गडदे, सतीश बोराडे, लक्ष्मण बोराडे, मुस्तफा पठाण, राजेभाऊ खराबे, दत्तराव खराबे, विठ्ठलराव कदम, रावसाहेब बाहेकर, राहुल बाहेकर, श्रीराम राठोड, विनायक बाहेकर, व ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अतोनात मेहनत घेतली असे मंठा तालुक्याचे क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ सर व त्यांचे सहकारी कैलास उबाळे गणेश खराबे सत्यवान पाटील मनोहर वीरकर संदीप पाटील अमोल सोनटक्के राजीव हजारे मनोज ठाकरे अविनाश लोमटे रमेश शिंदे विष्णुपंत पुणेकर डीजे चव्हाण ही सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होती यांची प्रमुख उपस्थिती होती