समाजभूषण पुरस्काराने अर्जुन पाडेवार सन्मानित
परतूर( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह आष्टी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.बुधवारी (दि.९) सायंकाळी आष्टी येथील धम्मपीठावर भन्ते कास्यपली,,भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,राष्ट्रवादी चे नेते बळीराम कडपे,काँग्रेसचे नेते नितीन जेथलिया, जगन भाई सोनवणे संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष, संदीप भैया निकुंभ दयावान सरकार, चौखाजी सौंदर्य,साय्यक पोलीस निरीक्षक नागगवे, हाजी रहमत पठाण, सौ, पुष्पाताई सोनवणे नगरसेविका भुसावळ,निशाताई गवई संविधान आर्मी महिला आघाडी अध्यक्षा, प्रिया ऊबाळे, सेने अभिनेत्री,सुवर्णाताई कांबळे, भगवान कांबळे,नगरसेवक बाबुराव हिवाळे, या मान्यवरांच्या उपस्थितीत पाडेवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे की,आपण आपल्या कर्तव्याच्या वाटचालीत समाजामध्य समता, न्याय,बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक चळवळीत अविरत सक्रिय राहून सामाजिक विषमता दूर करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे व देत आहात .
समाजाप्रती असलेली आपली निष्ठा व कार्य अगदी वाखाणण्याजोगे व प्रेरणादायी आहे.सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी आपण महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी चळवळीचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सतत कार्य करीत आहात याबाबत सार्थ अभिमान वाटतो.आपल्या समग्र कार्याचे सिंहावलोकन भूषणावह आहे म्हणून समाज भूषण पुरस्कार आपणास देण्यात येत आहे असे या सन्मानपत्रात म्हटले आहे.यावेळी भिराव गोटे, रामप्रसाद थोरात, सुदाम प्रधान, वसिम जमिनदार, सत्तार मास्टर, दीपक भदर्ग, शाहु आव्हाड, अमोल जोशी, रोहन वाघमारे,यांची ही उपस्थिती होती,
दिलेल्या सन्मानपत्रावर भगवान कांबळे,चोखाजी सौंदर्य,मारोती गायकवाड,राहुल कांबळे यांची नावे आहेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोती गायकवाड राहुल कांबळे, गणेश गायकवाड, किरण वाघमारे, संतोष खरात, रोहिदास कांबळे, प्रकाश कांबळे, यांनी मोलाचे सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहु आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य भगवान कांबळे यांनी मानले, यावेळी कार्यक्रमासाठी तालुक्यातील हजारो महीला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते,
-----------------------------