शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या परतुर विधानसभा प्रमुख पदी शिवाजी तरवटे तर तालुका सह प्रमुख पदी दत्ता अंभोरे यांची निवड
परतुर /(प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सूचनेनुसार आणी शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या शिफारसीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष परतुर विधानसभा प्रमुख पदी शिवाजी तरवटे आणि सह तालुका प्रमुख पदी दत्ता अंभोरे यांचे निवड नियुक्तीपात्राद्वारे निवड करण्यात आलेली आहे.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात१०%+१०%) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णावर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर राहावे. गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्यक व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोपरी ठाणे, येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा असेही दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.सदर नियुक्ती पत्रावर शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे राज्य कक्ष प्रमुख रामहरी भीमराव राऊत व सह कक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.