परतुर येथील नाट्यगृहाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी व अधिकाऱ्यांना दिल्या योग्य त्या सूचना,लवकरच नाट्यगृहाचे बांधकाम होणार पूर्ण


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात परतुर शहराच्या विकासात भर घालत असताना शहर व तालुक्यातील युवकांनी सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी परतूर शहरामध्ये व मराठवाड्यातील सर्वात उत्तम असे सुसज्ज एक हजार आसन व्यवस्था असणारे असे 17 कोटी रुपयाचे नाट्यगृह मंजूर करून घेतले त्या नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच जनतेच्या सेवेत ते रुजू होईल या नाट्यगृहामुळे परतूर शहरात तील व तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवक व युवतींना एक सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना आपल्या कला अविष्कार सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे
या नाट्यगृहाच्या कामाकडे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे बारकाईने लक्ष असून आज माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत नाट्यगृहाच्या बांधकामाच्या प्रगती विषयी चर्चा करीत लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या
मंत्री असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शहरासाठी भरीव निधी आणला होता त्याचाच एक भाग म्हणून परतूर शहराला एक सुसज्ज नाट्यगृह असावी ज्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना आपला कालाविष्कार आपली कला गुण यांचे सादरीकरण करता यावे या ठिकाणाहून एक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी यासाठी हे नाट्यगृह आणले होते खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये युवकांमध्ये कलात्मकता ठासून भरलेली असून त्या कालात्मकतेचा उपयोग समाज प्रबोधनासाठी व्हावा यासाठी सांस्कृतिक प्रबोधन करण्यासाठी या नाट्यगृहाची पायाभरणी केली होती लवकरच हे नाट्यगृह परतूरकरांच्या सेवेमध्ये रुजू होणार असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले

यावेळी नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर नगरसेवक संदीप बाहेकर बालाजी सांगोळे शत्रगुण कणसे कैलास बोणगे प्रवीण सातोनकर नरेश कांबळे प्रमोद राठोड मलिक कुरेशी व प्रशासकीय सर्व अधिकारी उपस्थित होते..!!

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड