धन्यवाद मोदीजी उपक्रमात भारतीय जनता युवा मोर्चा अव्वल,महिनाभराच्या कार्यकाळात भारतीय जनता युवा मोर्चा व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरांची कौतुकास्पद कामगिरी - चंद्रशेखर बावनकुळे,भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ०४ लाख "धन्यवाद मोदीजी" उपक्रमाचे पत्र संकलन


प्रतिनिधी समाधान खरात 
भारतीय जनता युवा मोर्चा ने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली असून महिनाभराच्या कार्यकाळात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ०४ लाखापेक्षा अधिक पत्र संकलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २७ योजनांचे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन पत्र संकलन करण्यात आले अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे कौतुक केले.

धन्यवाद मोदीजी या उपक्रमांतर्गत पत्र संकलनामध्ये ९९८३३ मतांची संकलन करून मराठवाडा प्रथम क्रमांकावर आहे तर पश्चिम महाराष्ट्र ६९२१६ पत्राचे संकलन करून दुसऱ्या क्रमांकावर आहे पत्र संकलनात उत्तर महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला असून ५९३४४ पत्रांचे संकलन उत्तर महाराष्ट्र ने केले आह चौथ्या क्रमांकावर विदर्भ विभागातून विदर्भ विभागाने ५८४७३ पत्राचे संकलन केले आहे तर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या कोकण विभागाने ५३६२० पत्रांच्या संकलन केले आहे रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ३,४०,४८६ एवढी पत्रांचे आकडेवारी समोर आली होती तदनंतर ६० हजार पेक्षा अधिकची पत्र संकलनाची माहिती समन्वयकांकडून प्राप्त झाली असून सुमारे ०४ लाखापेक्षा अधिक पत्र युवा मोर्चाच्या वतीने संकलित करण्यात आले असल्याची माहिती राहुल लोणीकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली

भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाड्या मोर्चे सेल व प्रकाश यामध्ये सर्वाधिक पत्र संकलन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले असून युवा मोर्चाच्या आगामी कार्यक्रमांसाठी व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालय समोर आयोजित कार्यक्रमांमध्ये फडणवीस व बावनकुळे यांनी जाहीर कार्यक्रमात राहुल लोणीकर यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा चे कौतुक केले आहे

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री अनुप मोरे सुशील मेंगडे शिवानी ताई दानी सुदर्शन पाटसकर अरुण पाठक बादल कुलकर्णी निखिल चव्हाण, योगेश मैन्द, धन्यवाद मोदीजी युवा मोर्चा अभियान प्रमुख भैरवी वाघ-पलांडे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले