गौतमी पाटील विरुध्द' मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांची तक्रार दाखल


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
           डान्सर गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी आक्रमक भूमिका घेत सेवली पोलीस ठाणे मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांना सेवली पोलीस ठाणे मार्फत दिनांक २४ नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमी पाटील हिचे डान्स शो हे आक्षेपार्ह आहेत. आणि या डान्स मध्ये अश्लील हावभाव व अश्लील चाळे दिसून येत आहे.
      हा सर्व प्रकार राज्यातील पोलीस बांधव यांच्या दुर्लक्षपणामुळे चालत असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केलं आहे. गौतमी पाटील हिच्या शो मध्ये अश्लील हावभाव आणि अश्लील चाळे यामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी युपी बिहार सारखी वाटचाल करेल का? आसा प्रश्नही मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केला आहे. गौतमी पाटील हिच्यावर कलम ५०९ म्हणजे अश्लील हावभाव करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी. व गौतमी पाटील हिच्या डान्सवर आणि हिच्या अश्लील वृत्तीला राज्यातील पोलीस प्रशासन यांनी त्वरित बंदी घालावी आशि मागणी सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र असून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते. गौतमी पाटील हिने महाराष्ट्रातील युवकांना स्वतःच्या फायद्यासाठी वेगळ्या वळणाकडे घेऊन जाऊ नये. असे सिद्धेश्वर काकडे यांनी  शेवटी  म्हटले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड