मॉ. बागेश्वरी साखर कारखान्याचा मोळी पुजनाचा कार्यक्रम संपन्न.

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
             श्रध्दा एनर्जी  अॅण्ड इंफ्राप्रोजेक्टस् प्रा.लि. मॉ. बागेश्वरी साखर कारखाना युनिट १ वरफळ ता. परतुर जि.जालना या साखर कारखान्याच्या नवव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ श्री अजय शिवाजीराव जाधव यांच्या शुभ हास्ते विधीवत पुजा करून मोळी टाकुन दि.१५/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला. या प्रसंगी कारखाना परिसरातील शेतकरी श्री बाजीराव खरात, श्री संतोष दिंड, श्री. महादेव खरात, श्री विष्णु बेरगुडे, श्री विष्णुपंत निर्वळ, व कारखान्यातील आधिकारी जनरल मॅनेजर श्री काशीनाथ निर्वळ, वर्क्स मॅनेजर श्री मनोज नवनाळे, चिफ् इंजिनिअर श्री गजानन जाधव, चिफ् केमीस्ट श्री अशोक शेंडगे, शेती अधिकारी श्री पंडीतराव खंदारे, पी.आर.ओ. श्री आर. आर. निर्वळ, इलेक्ट्रीकल इंजिनिअर, श्री लहु बचाटे, श्री सुंदरराव देशमुख, श्री हाणुमंत मुंगळे, श्री राहुल माने, श्री ज्ञानेश्वर देशमुख, सुरक्षा आधिकारी श्री दिनकर लिपन, कर्मचारी व आधिकारी हाजर होते.
कारखान्याचे हंगाम २०२२ - २३ या हंगामाची कारखान्याची गाळप क्षमता २५०० प्रति मेट्रीकटन प्रति दिवसावरून ४५०० प्रति मेट्रीक टन प्रति दिवस केल्यामुळे कारखाना गळीत हंगाम थोडया उशीरा सुरू होत आसल्याचे श्री अजय शिवाजीराव जाधव यांनी सांगितले. तसेच या वर्षी गेल्यावर्षाच्या तुलनेत एफ.आर.पी दराप्रमाणे निश्चितच जास्त भाव देण्यात येईल. ऊसाचा पहिला हाप्ता रू. २००० प्रति मेट्रीक टन देण्यात येईल. दुसरा हाप्ता पोळा सणाला रू. ३०० प्रति मेट्रीक टन व उर्वरित तिसरा हप्ता दिवाळीपुर्वी शासनाच्या एफ.आर.पी दराप्रमाणे दिला जाईल. असे श्री अजय शिवाजीराव जाधव यांनी सांगितले या वेळी प्रथम ऊस उत्पादक शेतकरी श्री सुनिल महादेव खरात व प्रथम ऊस पुरवठा करणारे पांच वाहणमालकांचा शाल, श्रीफल, टोपी बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. या हंगामास देखिल मागील हंगामाप्रमाणे शेतकरी व तोडणी वाहातुक ठेकेदारांनी सहकार्य करावे असे श्री अजय शिवाजीराव जाधव म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात