परतूर येथे सहजयोग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन.
परतूर:( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
येथील सहजयोग ध्यान केंद्रा च्या वतीने दीं:13 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6:30 वाजता जिल्हा परिषद प्रशाला मैदान परतूर येथे भव्य प्रमाणात सहजायोग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात आत्मसाक्षात्काराची जाणीव झालेली सहजयोगी बंधू व भगिनींनी कुंडलिनी जागृतिचे व आत्मसाक्षातकार झाल्याचे पावित्र द्यान देणार आहेत.
सहजयोग हा जगातील 150 पेक्षा अधिक देशा मध्ये प्रसारित झालेला असून या मध्ये सर्व जाती, धर्मातील बंधू व भगिनींना निःशुल्क प्रवेश घेता येणार आहे तरी नगरीतील व पंचकोशितील नागरिकांनी या संधी चा सह- कुटुंब सह परिवार उपस्थीत राहून
अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन परतूर येथील सहजयोग ध्यान केंद्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे .या बाबत अधिक माहिती जाणून घेण्या साठी जि.प.,मैदानावर उपस्थित राहावे . सहजयोग माध्यमातून शांतता,मन: शांति ची प्राप्ती होत असून सध्याच्या धावपळीच्या युगात हे सर्वांसाठीच अवश्य आहे. सहजयोग पद्धतीने शेतीत केल्यास त्यांना लाभ शेतकरी बांधवांना देखील झालेला आहे.असे एक ना अनेक फायदे सहजयोगामुळे होत असून या संधीचा सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आवश्य लाभ घ्यावा.
Comments
Post a Comment