परतुर मंठा मतदारसंघासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करत परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी खेचून आणून या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत मंठा येथील रेणुका देवी रोड च्या बहु प्रतीक्षित कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे हजारो भाविक भक्तांची देवीच्या दर्शनासाठी जाण्याची सोय होणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून नाबार्ड अंतर्गत लोणी खूप ते बानाची वाडी रस्ताही अनेक ठिकाणी खचून जात असतो त्यामुळे या रस्त्याला ज्या ठिकाणी रस्ता खचलेला असेल त्या ठिकाणी साईड वाल सह या रस्त्याचे सुधारणा करण्यात येणार असल्याचे आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले असून यासाठी 1.5 रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सीआरआयएफ निधीमधून मंठा ते विडोळी पाटोदा रस्त्याची सुधारणा करण्याबरोबरच पाटोदा जवळील पुलाचे बांधकाम करण्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे तर दैठणा जांब समर्थ रस्त्याच्या दुरुस्तीसह पुलाची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या माध्यमातून विकासाला चालना मिळणार असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे पुढे या पत्रकात आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे की राज्यात सत्ता बदल होताच परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये बजेट मधील 50 कोटींच्या कामासह आज घडीला पुन्हा एकदा 17 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे गतिमान सरकार असून जनसामान्यांच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे या पत्रकात लोणीकर यांनी नमूद केले आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण