ग्राऊन्ड रिपोर्ट : तळणी प्राथमिक आरोग्य केद्रांचा कारभार राम भरोसे
तळणी प्रतीनीधी रवी पाटील
तळणी " मंठा तालूक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या तळणी येथील प्राथमिक आरोग्य केद्रांचा कारभार हा राम भरोसे च आहे दोन मेडीकल अधिकारी व १५ कर्मचार्याची आरोग्य विषयक समस्याची सपूर्ण .जबाबदारी असताना सुध्दा आज प्रत्यक्ष्य पाहणीत सातच कर्मचारी उपस्थीत असल्याचे निदर्शनास आले यामध्ये यु एल कुटे मनिषा घनसांवंत सदीप गहीलोद आदेश घुले स्वाती सुरूसे नवनाथ सपाटे सचिन डोगरे हे कर्मचारी वेळेत उपस्थीत आढळून आले तर दोन वैद्यकीय अधिकारी असलेल्या केद्रात वेळेच्या आत दोनही वैद्यकीय अधिकारी गैरहजर दिसून आले एका कर्मचार्यानी वैद्यकीय अधिकारी एम आर चव्हाण यानां .सपर्क करून बोलावून घेतले
तळणी ग्रामस्थ ज्ञानेश्वर राठोड यानि जिल्हाधिकार्याला दिलेल्या निवेदनात सागीतले की तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांचे आरोग्य कर्मचारी वेळेवर उपस्थीत राहत नसून रुग्नाची हेळसांड होती ग्रामस्थ राठोड यानी स्वःत आरोग्य केद्रांची पाहणी केली असता उपस्थीती पटावरील १७ कर्मचार्या पैकी पाच कर्मचारी उपस्थीत होते तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांच्या अतर्गत दहा ते पंधरा गावे येत असून गरीब गरजू उपचारासाठी येथे येत असतात याकडे तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे साफ दुर्लक्ष होत आहे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर शासनाच्या लाखो रुपयाच्या व्यवस्था वैद्यकीय अधिकार्याच्या दुर्लक्षामुळे पडून आहे तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांतील कोरोना काळातील लाखो रुपयांची औषधी तळणी आरोग्य केद्रांत धूळखात पडून आहे
तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांच्या ईमारतीसाठी लोणीकंराच्या माध्यमातून चार कोटीचा निधी उपलब्ध झाला व कर्मचार्यांच्या निवास व्यवस्थेसह सुसज्ज ईमारत बाधण्यात आल्यानंतर ही आरोग्य केन्द्र आँनलाईन होण्यास दोन तीन वर्षाचा कालावधी लागला
वैद्यकीय अधिकार्याच्या सतत बदल्या
तळणी प्राथमीक आरोग्य केद्र अस्तीत्वात आल्यापासून या केद्रांतील वैद्यकीय अधिकार्यानी सहा महीन्यांचा कार्यकाळ पण घालवला नसेल कोरोना काळातील एक अपवाद सोडला तर तळणी येथील मेडीकल आँफीसरच्या सतत बदल्या होतच रहातत्तात एन आर चव्हाण एम के ढाकने महीना दीड महीन्यापूर्वीच तळणी प्राथमिक आरोग्य केद्रांत रूजू झाले तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांतील कर्मचार्यासाठी निवास व्यवस्था असताना सुध्दा काहीच कर्मचारी येथे वास्तव्यास रहातात त्यामुळे काही निवासस्थानाच्या इमारती धूळ खात पडून आहे जर सर्व कर्मचारी निवासस्थानी राहीले तर येणाऱ्या रुग्नाची गैरसोय होनार नाही आजही काही पदे रिक्त आहे जबाबदार वैद्यकीय अधिकारी याचा पाठपुरावा शासनाकडे योग्य पध्दतीने करू शकतो
पिण्याची पाण्याची गैरसोय
तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांत बोअर घेतलेला असून त्याला मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध असताना सुद्धा ये जा करणाऱ्या रूग्नाना पिण्याची पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही उन्हाळ्याची चाहूल काही दिवसावर आली असून त्यासाठी प्रयत्न होणे गरजेच आहे सध्या सपूर्ण जगात कोरोनाच्या भितीच्या सावटाखाली असताना त्याला तोड देण्याची तयारी शासन स्तरावर चालू असताना ग्रामीण भागात माञ कर्मचारी दांडया मारण्यातच धन्यता मानत आहे यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था या डबघाईला येत असून कामचुकार कर्मचार्यावर कारवाई होणे गरजेचे आहे
१०८ नाही
तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांत सध्या एक रूग्न वाहीका असून तीला कायमस्व स्वरुपी चालक उपलब्ध नाही तसेच ही रुग्न वाहीका फक्त कृटुब नियोजनातील स्त्री रूग्न व गरोदर माता यांना ने आन करण्यासाठीच आहे अपघाताच्या वेळी झालेल्या जखमीना ने आण करण्यासाठी ही रुग्न वाहीका . वापरण्याची मुभा केद्रांला नसल्याकारनाने येथे १०८ रुग्न वाहीका असन गरजेचे आहे किती तरी छोटया मोठया अपघाताच्या वेळी खासगी वाहनाचा वापर करावा लागला आहे
गैरहजर कर्मचारी
एम के ढाकणे वैद्यकीय अधिकारी
के एस पालवे (रजेचा अर्ज )
पी के शेवाळे ( रजेचा अर्ज )
जे ऐस सरकटे
एस एन सानप
के पी सानप
शासनाच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर लाखो रुपयाचा निधी उपलब्ध असताना सुध्दा कर्मचारी शासनाकडून मिळालेल्या सुविधा औषधी गरजू रुग्ना पंर्यन्त पोहाचवण्यात चालढकल पणा करत आहे तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांत लाखो रुपयाची औषधी पडून आहे ती औषधी कालबाह्य झाली असून जबाबदार कर्मचार्यावर कारवाई करावी या साठी जिल्हाधिकार्याना निवेदन दिले असल्याचे ग्रामस्थ ज्ञानेश्वर राठोड यांनी सांगीतले
मंठा येथे कुटूंब कल्याण आरोग्य शिबीराचे आयोजन असल्या कारनाने मी मंठा येथील आरोग्य केद्रांत जात होतो अशी प्रतिक्रीया मेडीकल आँफीसर एम आर चव्हाण यानी दिली