सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पिंपरखेडा येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 13 पैकी 10 सदस्य बीन वीरोध

परतूर प्रतिनिध कैलाश चव्हाण
       दि. 18 रोजी  पिंपरखेडा ता.परतूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 13 पैकी 10 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल भैया आकात यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
    यावेळी नवनिर्वाचित सदस्य श्री.पाराजी बंडू आप्पा मुळे,सौ.पद्माबाई पाराजी मुळे,सुखदेव किशनराव अंभिरे,शेख इब्राहिम शे.याशिन,रोहिदास आण्णासाहेब गरड,चंद्रप्रकाश नानाभाऊ सोम्मारे,अहमद खां.नसीर खां.पठाण,प्रल्हाद सखाराम सागुते,काशिनाथ सुंदर उकांडे यांची निवड झाली.यावेळी सोबत रामभाऊ मुळे,हुसैन पठाण,योगेश मुळे,मेहमूद सय्यद,निवृत्त्ती सोम्मारे,कैलाश मुळे,विठ्ठल सागुते,आंशिराम सोम्मारे,सुंदर उकांडे,अच्युत मुळे,गमाजी गरड यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत