निष्ठा व्यंग आणि कर्म कुशलता यांची अशी उंच शिडी तयार करा की असीम आकाशाची सीमा देखील संपून जाईल" - आमदार बबनराव लोणीकर ,उत्तुंग यश संपादन करण्याकरिता परीक्षेला उत्सव समजून सामोरे जा - आमदार बबनराव लोणीकर ,परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 99 परतूर विधानसभा मतदार संघातील विविध विद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण
सहभाग
प्रतिनिधी परतूर कैलाश चव्हाण
दिनांक 24 जानेवारी 2023
विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देता यावा आणि परीक्षा देण्यापूर्वी वातावरण तणावरहित करता यावे या उद्देशाने “परीक्षा पे चर्चा 2023” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाष चंद्र बोस “पराक्रम दिना”निमित्त आज एका देशव्यापी चित्रकला स्पर्धेचे आयोजन देशभरात शासकीय स्तरावरून सर्व विद्यालयात व महाविद्यालयात दिनांक 24 आणी 25 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज 24 जानेवारी 2023 रोजी मंठा परतूर व जालना तालुक्यात सर्वत्र विद्यालय व महाविद्यालयात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.
यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री बबनराव लोणीकर यांनी मतदार संघातील परतुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतुर तालुका परतुर जिल्हा जालना, योगानंद माध्यमिक विद्यालय परतुर तालुका परतुर जिल्हा जालना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आंबा तालुका परतुर जिल्हा जालना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातोना तालुका परतुर जिल्हा जालना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टी तालुका परतुर जिल्हा जालना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी चर्चाद्वारे हितगुज केले यावेळी ते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परतुर येथे बोलत होते. पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की पर्यत्नांची पराकाष्टा करत ध्येयाच्या दिशेने सतत वाटचाल करत रहा, वादळे उठतील झुंजत रहा, किनार्याकडे लक्ष ठेवून नाव हाकीत रहा यश तुमचेच आहे. सुख शांती आणि समाधान यशातच दडलेल्या असल्याने निष्ठा व्यंग आणि कर्म कुशलता यांची अशी उंच शिडी तयार करा की असीम आकाशाची सीमा देखील संपून जाईल.. प्रयत्नांती फळे निश्चितच आहे.
या प्रसंगी भगवानराव मोरे दया काटे रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात सुदामराव प्रधान विलासराव आकात मनोहरराव खालापूर नगरसेवक संदीप बाहेकर कृष्णा आरगडे प्रकाश चव्हाण लक्ष्मण बापू पवार मनोहरराव पेडगावकर प्रकाश दीक्षित नरेश कांबळे आष्टीचे सरपंच मधुकर मोरे सिद्धेश्वर सोळंके रवी सोळंके आर डी पवार अमोल जोशी हबीब शेख उमेश सोळंके बंडू मानवतकर विकास खरात रामजी आकात मकसूद सय्यद आदिल पठाण गटशिक्षणाधिकारी साबळे कल्याण बागल विष्णू कदम राम सोळंके उपस्थित होते.
शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग यांच्याशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा “परीक्षा पे चर्चा 2023” हा सहावा भाग येत्या 27 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडीयम मध्ये आयोजित होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तसेच परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी परीक्षा आणि शालेय जीवनानंतर आयुष्यात येणाऱ्या ताणतणावाबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेतून ‘परीक्षा पे चर्चा’ हा अभिनव संवादात्मक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जीवनाचा उत्सव साजरा करण्यासाठी ताणावर मात करण्यास मदत करता यावी हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे.
*आजादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राइक, कोरोना लसीकरणात भारत नंबर एक, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, आंतरराष्ट्रीय योगा दिन, चुली मधल्या धुरापासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती उज्वला योजना हे विषय या चित्रकला स्पर्धे करता ठेवण्यात आले होते.
प्रत्येक शाळा तसेच विद्यालयातील व महाविद्यालयातील सर्वोत्तम पाच स्पर्धकांना स्वातंत्र्य सैनिक तसेच राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित पुस्तकांचा संच आणि प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन परतूर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तर मंठा तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयात भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय राहुल बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले. 99 परतूर विधानसभा मतदारसंघातील जालना मंठा व परतुर तालुक्यातील विविध सीबीएससी शाळा, राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा, नवोदय विद्यालये आणि केंद्रीय विद्यालये यांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता गट शिक्षण अधिकारी कुलधर साहेब, केंद्रप्रमुख तरवटे सर, विस्तार अधिकारी साबळे सर, विस्तार अधिकारी कोळकर मॅडम, स्पर्धा प्रमुख परिमल पडेगावकर गंगाधर अंभोरे यांनी विशेष प्रयत्न केले.