दहीफळ खंदारे येथे ग्रामीण रुग्नालयात डॉक्टर गैरहजर,तर औषधाची नासधूस

तळणी प्रतिनीधी रवी पाटील
    तळणी येथून जवळच असलेल्या दहिफळ खंदारे येथील प्राथमीक आरोग्य केद्रांचा कारभार ग्रामस्थानी . उघडकीस आणला कितेक दिवसाचा औषधीचा साठा रुग्नाना न देता प्राथमीक आरोग्य केंद्रांतील कर्मचार्यानी परस्पर त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकार ग्रामस्थाच्या निदर्शनास आल्यानंतर . या सबंधीत वैद्यकीय अधिकार्यासह दोषी कर्मचार्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थानी जिल्हाधिकार्याना दिले आहे 
डॉक्टर याच्या येण्याची वाट पहताण रुग्न
दहीफळ खंदारे येथील वैद्यकीय अधी कार्यासह काही कर्मचारी हे आठ आठ दिवस केद्रांवर येत नाही आठ आठ दिवसाच्या स्वाक्षऱ्या एकदाच उपस्थीती रजिष्टवर करण्यात येतात हा प्रकार या आधी सुध्दा दोन ते तीन वेळा ग्रामस्थानी उघडकीस आणला तरी सुध्दा त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही निवासाची व्यवस्था असताना सुध्दा एक दोन कर्मचारी वगळता कोणीच मुख्यालयी . थांबत नाही वैद्यकीय अधिकारी डॉ . पूनम मान्टे या आठवड्यातून एक ते दोन वेळा च जालना येथून . येऊन आठवडयाचा स्वाक्षऱ्या एकदाच . करतात या प्राथमिक आरोग्य केद्राचा कारभार हा रामभरोसे कारभार झाला असुन ग्रामस्थानी तीन तीन वेळा यांचा कारभार चव्हाट्यावर आणून सुध्दा कुठलीच कारवाई या कामचुकार अधिकार्यावर होत नाही नेमक यांना कोण पाठीशी घालून गोर गरीब ग्रामस्था वर अन्याय करत असल्याच्य भावना प्रत्यक्ष्य भेटीत बोलून दाखवल्या 

औषधी पडून 
तळणी प्राथमीक आरोग्य केद्राप्रमाणेच दही फळ आरोग्य केद्रांत औषधीचा लाखो रुपयाचा साठा पडून आहे प्राथमीक आरोग्य केद्रांच्या या गलथान कारभारामुळे येणारे रुग्न सुद्धा बोटावर मोजण्याइतकेच येत असून लाखो रुपयांची औषधी विनाकारणची . मागवून तीचीच विल्हेवाट लावण्याचे पाप हे आरोग्य कर्मचारी करत आहेत तळणी येथील प्राथमीक आरोग्य केद्रांची वस्तू स्थिती दिव्य मराठीत प्रकाशीत होताच दहिफळ खंदारे येथील औषधी साठा हलवण्याच्या हालचाली काही कर्मचार्यानी केल्या तेथील औषधी साठ्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असतानाच ग्रामस्थानी तो प्रयत्न हाणून पाडला व जिल्हाधिकार्याना कारवाई करण्याचे निवेदन दिले यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात हे कळेल 
लाखो रूपायची औषधी नासधूस
या प्राथमिक आरोग्य केद्रांचे बरेचसे कर्मचारी जालना परतूर मंठा येथून ये जा करतात कधी कधी डॉक्टर नसल्या कारणाने रुग्नाना मंठा किवा तळणी येथे खासगी रुग्नालयात जावे लागते रुग्नाना ना येथे बसण्याची सुवीधा ना पिण्याच्या पाण्याची सुवीधा दहिफळ प्राथमिक आरोग्य केद्रांला पंधरा विस गावाची आरोग्याची जबाबदारी असताना सुध्दा याकडे केद्रांतील सर्व जबाबदार कर्मचारी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी स्थानिक लोकप्रतिनीधी यांचे साफ दुर्लक्ष आहे या केद्रांत स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून स्वःत जिल्हाधिकार्यानी पाहणी करुन दोषी वर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थानी केली 

आज प्रत्यक्ष ग्रामस्थासह या केद्रांला भेट दिली असता तालुका आरोग्य अधिकारी राठोड याच्याशी सपर्क केला असता त्यानी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवली

दहिफळ प्राथमीक आरोग्य केद्रांचे कर्मचारी आठ आठ दिवस येत नाही रूग्नाना सेवा मिळत नाही लाखो रुपयांची औषधी साठा पडून आहे रोज रुग्न वाट पाहून निघून जातात डॉक्टरा सोबत सपर्क होत नाही या सर्व कर्मचार्यावर कारवाई होणे गरजेचे आहे 
प्रेम सदावर्ते ग्रामस्थ दहिफळ खंदारे 


दहिफळ आरोग्य केद्रांतील कर्मचार्यानी संगमनत करून औषधी जाळण्याचा सपाटा लावला आहे तो आम्ही प्रत्यक्ष्य बघीतला असून डॉ पूनम मान्टे डॉ राठोड एच एन ईकडे याच्यासह अण्य दोषीवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्याना निवेदना द्वारे केली असल्याची माहीती विजेन्द्र म्हस्के यानी दिव्य मराठीशी बोलताना दिली

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड