जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
जालना तालुक्यातील खरपुडी येथे सैनिकी शाळेजवळ असलेला बौद्ध धम्माचा पंचरंगी ध्वज अज्ञात व्यक्तीने पाडल्याची घटना आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनाश आली.
     सदरील घटना खरपुडी शिवारातील गट नं. 197 मध्ये   घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून तालुका पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरातील नागरिकांनी अज्ञात व्यक्तीने ध्वज पाडल्या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केले आहे. हा धम्मध्वज पाडणार्‍यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

घटनास्थळावर तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांच्यासह पोलीस पथक, महसूल विभागाचे पथक आणि पंचायत विभागाचे पथक दाखल झाले आहे. सध्या आंदोलकानी रस्ता रोको आंदोलन सकाळपासून सुरू केले असून गुन्हा दाखल होईपर्यंत रस्त्यावरून न उठण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
    वातवरण तनाव पूर्ण असले तरी शांतता रास्ता रोको चालू आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड