युवकानी राष्ट्रबाधनी साठी पुढाकार घेऊन ग्रामीण जिवन आत्मसात करावे - प्रार्याय डॉ भारत खदारे

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतुर यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिरचे उद्घाटन झाले  
या प्रसंगी डॉ खंदारे बोलत होते पुढे बोलताना म्हणाले कि आपल्या देशातील ग्रामीण जिवन हे स्वालबी असून बहुतेक जण हे आपल्या कर्तेतुवावर जीनव जगत आहेत या उलट शहरी भागातील नागरिका दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे सुखी जीवनासाठी ग्रामीण भागात राहाने उत्तम आहे राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराची थीम युवकाचा ध्यास ग्राम शहर विकास ही घेऊन विद्यार्थी मैजे दैठना खुर्द तालुका परतुर या गावी सात दिवस विशेष निवासी शिबिरामध्ये सहभागी झाले या शिबिराचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ . माणिकराव थिटे , स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आणि अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ . भारत खंदारे हे होते तसेच डॉ . भारत धोत्रे, प्रा . डॉ . सुभाष वाघमारे तर गावातील प्रथम नागरिक गावचे सरपंच श्री सुनील सुदामराव तायडे , श्री राजाभाऊ काटकर श्री अमृतराव सवने श्री वसंतराव सवने तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री भापकर सर , माने सर यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ . माणिकराव थिटे यांनी ग्रामीण जीवन हे आरोग्यदायी स्वस्थ आहे हे सांगून ग्रामविकास देखील शहराच्या बरोबरीने होणे आवश्यक आहे असे सांगितले . प्राचार्य डॉ . भारत खंदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्ट आणि महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ . राजेश सुसर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ . अनिल कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा . राम खालापूरे यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा . डॉ . शंकर तळेकर, प्रा डॉ अर्जुन वायकर, प्रा . डॉ यशवंत दुबाले, प्रा डॉ . बापु सरवदे , ग्रंथपाल डॉ . वैशाली चौधरी , डॉ . केशव बरकुले, तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड