यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना (खुर्द) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.....
सातोना प्रतिनिधी पांडुरंग शिंदे
दि.२६ जानेवारी २०२३ रोजी यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व यश प्रायमरी इंग्लिश स्कूल सातोना येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब (काका) आकात यांची तसेच प्रमूख उपस्थिती म्हणून इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. सुरुवातीला दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. सचिनराव आकात यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते यशोदर्पण चे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आले. वर्ग नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत तसेच वर्ग पहिलीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गित सादर केले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयराम खंदारे यांनी केले
त्यानंतर देशभक्तीपर गीत नृत्य सादर करण्यात आले व विद्यार्थी भाषणे सादर करण्यात आले सहशिक्षक गणेश गोरे यांनीही अनमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब आकात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी यश क्रीडा महोत्सव डिसेंबर- २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या विविध क्रिडाप्रकारात सर्व प्रथम आलेल्या सर्व गुणवंतांचा पुष्पगुच्छ ,सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान या प्रजासत्ताकदिनी कु. तन्वी कैलास पवार या विद्यार्थिनीचा वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प तसेच भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
देशभक्ताच्या विविध वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बळीराम भले व महादेव गायकवाड यांनी तर आभार अनिल सुरूंग यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यश इंग्लिश चे प्राचार्य शामीर शेख, यश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम खंदारे, दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.