माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते बाबुल्तारा ते जालना ते मंठा हायवे रस्त्यापर्यंतच्या 01 कोटी 26 किमतीच्या डांबरीकरणाच्या कामाचे करण्यात आले उद्घाटन,राज्यातील सरकारमध्ये बदल होताच परतूर मतदार संघामध्ये विकास कामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी आणला


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
राज्यातील सरकारमध्ये बदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर परतुर विधानसभा मतदारसंघासाठी विविध माध्यमातून 500 कोटी रुपये निधी आणला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
    ते बाबुलतारा ता परतूर येथे संपन्न झालेल्या एक कोटी 26 लाख रुपये किमतीच्या बाबुल्तारा ते जालना मंठा हायवे रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, मतदार संघातील विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, निधी खेचून आणण्यासाठी आपण नाबार्ड मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बजेट जिल्हा नियोजन मंडळ आदी माध्यमातून मतदार संघासाठी निधी खेचून आणला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले,
  परतूर विधानसभा मतदारसंघातील 176 गावच्या वाटर बीडचे पाणी येत्या महिनाभरामध्ये सर्वच गावांमध्ये पोहोचणार असून या माध्यमातून गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले उन्हाळ्याचे चाहूल लागली असून पाणवते असताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणाने वॉटर ग्रीड योजनेच्या पाण्याचा उपयोग या गावांना होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आपण काम करीत असताना मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत मंत्रीपदाच्या काळात चार हजार 700 कोटींचा निधी खेचून आणला होता त्या माध्यमातून मतदार संघातील रस्ते, विविध प्रकारची सभा मंडपे पंचवीस पंधरा निधी अंतर्गत रस्ते गावांतर्गत रस्ते आमदार फंड सिंचनासाठीच्या सुविधा जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठे काम उभे राहिले होते या कामाचा फायदा निश्चितपणाने परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील जनतेला झाला असून येणाऱ्या काळातही आपण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
      सर्वसामान्य जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे काम गेली 35 वर्षे आपण करत असून सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही त्यासाठी वाटेल ते करील परंतु सर्वसामान्य जनतेने टाकलेला विश्वास कधीही कमी होऊ देणार नाही असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर जि प सदस्य हरिराम माने माजी पंचायत समिती सभापती रामेश्वर तनपुरे पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले शहाजीराक्षी दिलीपराव लोकरे पद्माकर कवडे रामचंद्र काळे बाबासाहेब कराळे काशिनाथ गिरी विष्णू जगताप राजाभाऊ मुळे हनुमान राव चिखले शिवाजीराव भेंडाळकर विश्वंभर शेळके संतोष कोळे, पांडुरंग काळे ओम मुळे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले