शेतकऱ्यांच्या कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा व विज बिल माफ करण्यात यावे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतुर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन


 परतुर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र भर कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा याकरता महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल  महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे 
कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासनाचा हमीभाव ६ हजार असल्यामुळे खाजगी व्यापारी सुध्दा ७ ते ८ हजारामध्ये कापूस खरेदी करत आहेत. हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. अजुन शेतकऱ्यांचा ७०-८० टक्के कापुस घरामध्ये पडून आहे. हा कापुस शेतकऱ्यांना विकणे खुप गरजेचे असुन त्यांच्या मुलां-मुलींचे लग्न शिक्षण व दैनंदीन गरजा भागवण्यासाठी कापुस विकणे गरजेचे आहे.
योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे व इतर शेतीशी संबंधीत प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कापसाला हमीभाव १२ हजार रूपये करावा व शासनाने स्वतः कापूस खरेदी करावा.
महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बीलाच्या युनिट मध्ये वाढ न करता इतर आकारामध्ये भरमसाठ वाढ केलेली असुन त्यामुळे ती दिसुन येत नाही. केलेली वीज बिलामधील वाढ ही नागरीकांना परवडणारी नसुन ती संपुर्ण जनतेची दिशाभुल करणारी आहे. ती अतिरीक्त वाढ सर्व सामान्य जनतेवर हकनाक पडत आहे ती अतिरीक्त वाढ तात्काळ रद्द करावी. असा इशारा वंचित बहुजन आघाडी परतुर तालुका अध्यक्ष रवी भदर्गे रोहन वाघमारे बाबासाहेब शिंदे सुभाष खरात विजय खरात राहुल नाटकर आकाश मुंडे सदाभाऊ शिरसाठ प्रवीण मोरे यांच्या वतीने देण्यात आले आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण