भागुबाई लिंबाजी सवने यांचे निधन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथील जेष्ठ नागरिक श्रीमती भागुबाई लिंबाजी सवने वय ८५ वर्ष यांचे दि १५ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर सकाळी दहा वाजता दैठणा खुर्द येथील शेतात अंतसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बागेश्वरी साखर कारखान्याचे माजी एम.डी बंडेराव सवने, सुरेश सवने यांच्या त्या आई होत्या. यावेळी अंत्यसंस्काराला माजी आ सुरेशकुमार जेथलिया, बळीराम कडपे, बालासाहेब आकात, रमेश सोळंके, राजेश काकडे, बाबुराव हिवाळे, छत्रुघ्न कणसे, यांच्यासह नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.