सामाजिक बांधिलकी म्हणून एक दिवस समाजासाठी खर्च करा:- निर्धास राठोड
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
क्रांतिकारी संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास भूमिपूजन समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा असंख्य लोकप्रतिनिधी व अध्यात्माशी निगडित मान्यवर पोहरादेवी ला येत असून बंजारा समाज बांधव आणि डॉ रामराव बापूंना मानणाऱ्या समस्त नागरिकांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ला येण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.
संपूर्ण मानव जातीला भूतदया,निसर्गातमानवता,प्रति आदराचीभावनासातत्याने जपण्याचीशिकवणूक दिलेल्या संतसेवालालमहाराज तीर्थभूमीआणि सती सामकी मातादेवस्थान उमरी गड पायाभूतविकासाच्याभूमिपूजनासाठी
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत शासनातील अनेक मान्यवर आणि अध्यात्म क्षेत्रातील असंख्य गणमान्य उपस्थित राहणार असल्याने समस्त समाज बांधव भगिनींनी या सोनेरी क्षणाचे भागीदार होण्यासाठी येथे 12 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.