का-हाळा येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून पर्यटन विकास निधीअंतर्गत करळेश्वर मंदिर येथे १ कोटी ७५ लक्ष रुपये किमतीच्या भक्त निवास तीन सभागृह सार्व जनिक स्वछता ग्रह तार कुंपण व विकास कामांचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण,वॉटर ग्रिड योजने करीता कऱ्हाळा येथे नवीन जळकुंभाचे आमदार लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
खंडेश्वर करळेश्वराच्या आशीर्वादाने गेली 35 वर्ष राजकीय पटलावर काम करताना मला सदैव यश मिळत गेले प्रतिपादन राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले 
 पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात खंडेश्वर मंदिराचे आष्टी येथील सिद्धेश्वर मंदिराचे अन्यन साधारण महत्व असून, माझ्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ खंडेश्वर सिद्धेश्वराच्या मंदिरातच वाढवण्यात आला त्यामुळे संपूर्ण राजकीय प्रवासा आष्टी व परिसर या ठिकाणाहून सुरू झाल्याने आपण मंत्री पदावर असताना पर्यटन विकासाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून आष्टी येथील खंडेश्वर मंदिर असेल मंदिर असेल गणपती मंदिर असेल बाप्पा या मंदिरा असेल आष्टी येथील कारळ्याचे करळेश्वर मंदिर असेल, नागरतास असेल या सर्व भागांमध्ये पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विकास कामे केली असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
यावेळी बोलताना लोणीकर पुढे म्हणाले की महाशिवरात्र श्रावण महिन्यामध्ये करळेश्वराच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात त्यांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी त्यांना खऱ्या अर्थाने सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज झालेल्या लोकांपासून विकास कामांमध्ये भव्य दिव्य असा भक्तनिवास स्वयंपाक ग्रह भव्य कमानी या माध्यमातून झाले असून यामुळे निश्चितच या परिसराची शोभा वाढली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
  साकारलेल्या सुंदर कामामुळे आपणास आनंद असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातील भारत निर्माण अंतर्गत झालेल्या विहिरीचे पाणी येथे आठ दिवसात संपणार असून त्यामुळे गावाला पाण्याची टंचाई भासणार आहे म्हणून यासंदर्भामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये वॉटर ग्रीड चे पाणी काराळा गावाला जोडण्यात येईल असे आश्वासन यावेळी उपस्थित गावकऱ्यांना आमदार लोणीकर यांनी दिले
मतदार संघाचा चौफेर विकास करताना वीज पाणी सिंचनाचे प्रश्न आधी प्रश्न आपण सातत्याने हाताळत मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
 या वेळी भगवान आप्पा थोरात, विठ्ठल तात्या थोरात व आष्टीचे सरपंच मधुकर मोरे माजी सरपंच बाबाराव थोरात अमोल जोशी बबलू सातपुते ब्राह्मण वाडी सरपंच रवी सोळंके सिद्धू पाटील सोळंके मारुती थोरात तर कऱ्हाळा येथे श्री बंकटराव सोळंके मा जि सदस्य रमेश काका सोळंके सिद्धू पाटील सोळंके अण्णासाहेब पाटील ढवळे रंगनाथराव येवले संपतराव टकले रवी भैया सोळंके मंजुळदासराव सोळंके एकनाथांना सोळंके भास्करराव सोळंके भरतराव देशमुख गणेश सोळंके यांच्या सह गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले