पोहारादेवी तीर्थक्षेत्र विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे बंजारा बांधवांनी साक्षीदार व्हावे -सामाजिक कार्यकर्ते मोहन आडे
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोरागड व उमरी येथे येत्या १२ फेब्रुवारीला होणाऱ्या संत सेवालाल महाराज अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वज रोहन आणि ५९३ कोटी रुपयेची तीर्थक्षेत्र विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे बंजारा बांधवांनी साक्षीदार व्हावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते मोहन आडे यांनी केले.
जालना जिल्ह्यातील परतूर मंठा घनसावंगी अंबड,जालना तीन मतदार संघात बंजारा समाज जास्ततीन मतदार संघात बजारा समाज जास्त प्रमाणात वास्तव्यास आहे. मोहन आडे हे तांडो तांडा जाऊन प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक भेटून येत्या १२ फेब्रुवारीला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे होणाऱ्या सेवाध्वज कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान करत आहे.
या भव्य समारंभ कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, कॅबिनेट मंत्री नामदार संजय राठोड यांच्यासह मंत्रीगण, आमदार, खासदार आणिसमाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती उपस्थित राहून, संत सेवालाल महाराजाचे दर्शन घ्यावे व या कार्यक्रमात लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे.
आपल्या बंजारा समाजाची एकता व संघटन शक्ती सरकार समोर दाखवून समाजाच्या विविध समस्या प्रश्न व विकास सोडविण्याकरिता माता-भगिनीसह यावे असे आव्हान मोहन आडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.