पुतळा परिसरात विटंबना प्रकरणी त्या आरोपची सखोल चौकशी करणे बाबत राष्ट्रीय लहूशक्ती संघटने चे निवेदन
जालना प्रतिनिधी समाधान खरात
खरपुडी तालुका जिल्हा जालना येथे काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरामध्ये आरोपी शंकर जाधव यांनी येथे विटंबना केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे परंतु सदर आरोपीने ही विटंबना एकट्यानेच केली किंवा आणखीन कोणी होते किंवा त्याला या विटंबना करण्यासाठी कोणी पाठबळ दिले का याची सखोल चौकशी करून संबंधितात वर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय लहुजी लहूशक्ती संघटनाने एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे
निवेदनात पुढे सांगितले आहे की संबंधित कारवाहिनी लवकरात लवकर झाली नाही तर राष्ट्रीय लहुशक्ती संघटना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे
या निवेदनावर शहराध्यक्ष योगेश भोसले शाखा अध्यक्ष रितिक भोसले साहिल भोसले आशिष भोसले आतिश भोसले आशिष मनोज भोसले किरण घोरपडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत