विद्यार्थ्यातील कलागुणांना वाव देऊन स्पर्धेत टिकणारी पिढी घडवा- मंदाताई लोणीकर
परतुर - कैलाश चव्हाण
स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर पुस्तकी ज्ञाना सोबतच विद्यार्थ्यातील कलागुणांना वाव देऊन शिक्षण द्या जेणे करून विद्यार्थी स्पर्धेचा सामना करू शकतील असे सर्व प्रयत्न शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल मध्ये होताना दिसत आहेत असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या उद्घाटक मंदाताई लोणीकर यांनी शाळेत आयोजित वार्षिक स्नेह संमेलना प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा. संदीप बाहेकर ,संस्थेचे अध्यक्ष मा. दिनकरराव चव्हाण, डॉ. प्रमोद आकात , डॉ रवि गायकवाड, देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल चे संचालक संतोष भाऊ चव्हाण , सुबोध भैय्या चव्हाण,डॉ.भाग्यश्री चव्हाण , गट समन्वय कल्याणराव बागल, बाबासाहेब तरवटे, प्राचार्य भागवतराव नाईकनवरे, अंजलीताई बागल, अर्चनाताई तनपुरे, अलका सूर्यवंशी मॅडम, विष्णू तोटे,राजेश भुजबळ, शत्रुघ्न कणसे , राजेश काकडे , प्राचार्य गजानन कासतोडे , प्रदीप सुरुंग, प्रकाश चव्हाण, सुधाकर बापू सातोणकर, एकनाथजी कदम आदी उपस्थित होते.
यावेळी संदीप बाहेकर ,डॉ. प्रमोद आकात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे वेळी शाळेमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सदरील कार्यक्रम प्रसंगी शाळेतील चिमुकल्या मुलांनी मराठी हिंदी लोकगीत, भारुड, बडबड गीत, लावणी, मूकअभिनय देशभक्ती पर गीत सादरीकरणाने सर्व प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता. सदरील मुलांच्या कलाविष्काराचे सर्व प्रेक्षकांनी व प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रदीप चव्हाण, राजेश कार्लेकर, प्रदीप साळवे शाळेतील शिक्षिका मनीषा लहाने, नयना जयद, मनीषा लाळे, नूतन नलावडे, साक्षी झरेकर, अरुणा दीक्षित, चंद्रकांत कपाळे, एल एस कदम, नितीन मुजमुले व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती राखी मुंदडा व वंदना कक्रिये मॅडम यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य कास्तोडे व आभार प्रदर्शन श्रीमती पूजा पावले मॅडम यांनी केले.