अखेर त्या वानरास पकडण्यात वन विभागाला यश
परतुर प्रतिनिधी संतोष शर्मा
परतुर शहरातील मोंढा भागात गेल्या सात-आठ दिवसापासून एका पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घालून साठे नगर या भागातील चार नागरिकांना कडाडून चावा घेतला होता त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागले होते या संदर्भात परतुर शहरातील साठे नगर भागातील नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांनी वन विभागाला एका निवेदनाद्वारे मागणी केली होती की पिसाळलेल्या वानरास त्वरित पकडावे नसता तो पिसाळलेला वानर अजूनही नागरिकांना चावा घेऊ शकतो यामध्ये चावा घेतलेले नागरिक दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही
दिनांक 16/02/2023 रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या कुशल बुद्धी ने अनेकांना चावा घेणारा पिसाळलेला लंगुर प्रजा तिचा माकडस वनविभागाच्या सर्व टीम ने साठे नगर येथे दाखल होऊन त्या पिसाळलेल्या माकडाला जेर बंद केले या माकडाने परतुर मध्ये दहशितेचे वात वरण निर्माण केले होते आता परतूर करांनी दिलासा मिळाला असुन सर्व वन विभाग अधिकाऱ्याचे शहरातील नागरिकांनी मनापासून आभार मनले आहे