परतूर येथे एचआयव्हि/एडस् विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु) मार्फत जिल्हास्तरावर कलापथकांचे एचआयव्ही / एड्स विषयी माहिती व व्यापक जनजागृतीकरिता शहरी/ग्रामिण भागात पोहचण्याच्या अनुषंगाने परतूर येथे जनजागृति कार्यक्रम संपन्न झाला.
           हा जनजागृति कार्यक्रम जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जालना व एकात्मिक सल्ला व चाचणी केन्द्रग्रामीण रूग्णालय परतूर ,आयएसआरडी अंतर्गत लिंक वर्कर स्कीम जालना, सेतू चॅरिटेबल ट्रस्ट जालना यांच्या सहकार्याने पार पडला. यावेळी ईश्वर सेवा लोक कला ग्रूप द्वारे गाण्यांच्या माध्यमातून एचआयव्ही होण्याची कारणे, उपचार व एचआयव्ही लागण होऊ नये म्हणून करण्यात येणारे प्रतिबंधक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयसीटीसी समुपदेशक शिवहरी डोळे, लिंक वर्कर स्कीम चे नरेश कांबळे तसेच सेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रियंका कांबळे व ईश्वर सेवा लोक कला ग्रूप मधील कलाकार शाहीर बाबू सेवा राठोड,सुनील मुरलीधर केलकर,अंकुश सखाराम चव्हाण,केशव लालसिंग आडे,पारस गणपत जाधव,अर्जुन शिवराम घुसले यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत