जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या मुद्द्यावरून आमदार लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर,जालना शहरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर मुख्याधिकाऱ्यांना केले निरुत्तर


प्रतिनिधी समाधान खरात
 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी गेल्या दोन वर्षात कृषी संजीवनी योजना मृत झाली होती तिला नवसंजीवनी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे म्हणत जिल्हा कृषी अधीक्षकांना चांगलीच धारेवर धरत शेतकऱ्यांच्या हिता च्या असलेल्या योजनेला, गती देण्याचे काम करा असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की गेली अडीच वर्षे ही योजना गतप्राण झाली होती अधिकाऱ्यांनीही मध्यंतरीच्या काळात हाराकिरी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारूनही त्यांच्या कामाच्या संदर्भातली पूर्वसंमती त्यांना दिली जात नाही, हा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आपण मंत्री असताना मंठा येथील श्री रेणुका देवी मंदिरासाठी पर्यटन विकास निधी अंतर्गत 15 कोटी निधी आणला होता या निधीच्या माध्यमातून हजार असं क्षमता असलेले भव्य भक्तनिवास, जलकुंभ शौचालय परिसर विकास त्यासोबत स्वयंपाक ग्रह घनकचरा प्रकल्प आधी गोष्टी प्रस्तावित होत्या मात्र मंठा नगरपंचायत ने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे तो निधी परत गेला आताही आपण मंठा कब्रस्तान ते देवी रोड तहसील साठी चार कोटी रुपये निधी नाबार्डच्या माध्यमातून तर सहा कोटी रुपयांचा निधी नगर विकासच्या माध्यमातून आणला असल्याचे सांगतानाच मंठा येथील श्री रेणुका देवी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवामध्ये रोज 25 हजार लोक नियमितपणे ये जा करत असतात त्याचबरोबर याच देवी रोडवर, न्यायालय तहसील पंचायत समिती कस्तुरबा गांधी विद्यालय भूमी अभिलेख कार्यालय यांच्यासह सर्वच कार्यालय आहेत मात्र कार्यालयात येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो म्हणून येत्या दोन दिवसात, या रस्त्याच्या प्रशासकीय मान्यता तयार करा येत्या महिनाभरात आपल्याला हे काम सुरू करायचे आहे असे यावेळी बोलताना आमदार लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले
 मंठा पंचायत समिती कडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावरून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या रस्त्याला क्रमांक असल्यामुळे पंचायत समितीला जाण्यासाठी रस्ता नाही अशा परिस्थितीमध्ये तांत्रिक बाबी पूर्ण करून या रस्त्यासाठी क्रमांक उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हा रस्ता करता येईल अशी यावेळी त्यांनी या बैठकीदरम्यान सांगितले
मधुर मंठा विधानसभा मतदारसंघातील मंठा तालुक्यातील पूर्णा नदीतील वाळू माफ यांनी केलेले उत्खनन त्यामुळे रस्त्यांची चाळणी झाली असल्याचे यावेळी सांगताना जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाने लक्ष द्यावे जेणेकरून रस्त्यांचे नुकसान होणार नाही
जिल्ह्यातील जुगार मटका अवैध धंद्याच्या मुद्द्यावरून ही लोणीकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले
परतूर तालुक्यातील अकोली सातोना बुद्रुक व दैठणा बुद्रुक कोकर्सा बरबडा नळदोह वझर सरकटे नांगरतास देवगाव खवणे, पिंपरखेडा केदार वाकडी हेलस ,परतुर, तालुक्यातील सावरगाव रोहिना बुद्रुक आष्टी परतुर दैठणा पाटोदा माव या गावातील बालनंद स्वामी संस्थान व दैठणा येथील श्री दत्त मंदिर संस्थान दैठणा बुद्रुक येथील तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत येणाऱ्या प्रमाणपत्राच्या बाबतच्या त्रुटी लवकर दूर करण्यात याव्यात जेणेकरून या भागाचा टप्प्याटप्प्याने विकास निधी देऊन विकास करता येईल 
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की जालना शहरातील अंबड बायपास परिसरापासून सर्व कार्यालय तसेच मंठा रोड पर्यंत, झालेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले
  सदरील बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केलेल्या विविध विभागाच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांची बोलती बंद होताना दिसली
या बैठकीला पालकमंत्री अतुल सावे खासदार बंडु जाधव आमदार राजेश टोपे संतोष दानवे नारायण कुचे, आमदार राजेश राठोड जिल्हाधिकारी विजय राठोड जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड