सांगता समारोप प्रसंगी मा.आ.जेथलिया यांना अश्रु अनावर, रामकथेची भक्तीमय वातावरणात सांगता,रामकथा ही परिवर्तनाची कथा ह. भ. प. रामराव महाराज ढोक



.
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   रामकथा ही परिवर्तनाची कथा आहे. जो पर्यंत मानवाच्या जीवनात परिर्वतन होत नाही तो पर्यंत माणसाची प्रगती होत नाही जीवनात वावरतांना सर्वांचे हिताचे रक्षण करा असे प्रतिपादन ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी केले. मा. आ. सुरेशकुमार जेथलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथे अयोध्या नगरीत सुरू असलेल्या रामकथेच्या सांगता समारंभी मंगळवारी दि.१४ रोजी ह. भ. प. रामराव महाराज ढोक भाविकांना मार्गदशन करत होते.


   कथा सांगता प्रसंगी बोलतांना ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी रावण वध व रामराज्यअभिषेक या कथे चे वर्णन केले रावण वध हे द्रुष्टाच्या संहाराचे प्रतीक आहे, वाईटावर चांगल्याचा विजय होण्यासाठी द्रूष्ट प्रवृत्तीचा नाश करावा लागतो. रामाला रावणाशी युद्ध करावे लागले आणि द्रूष्ट प्रवृत्तीचा नाश झाला असे ढोक महाराज म्हणाले.रावण हा अत्यंत वाईट माणूस होता कारण रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच, खूप ज्ञानी आणि विद्वानही होता.मृत्युसमयी रावणाने लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यात आयुष्याचे रहस्य लपलेले आहे. रावणाचा वध प्रभू रामाने केला रावण हा महादेवाचा खूप मोठा भक्त होता रावणाच्या मृत्यूच्या वेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की रावण हा नीती आणि शक्तीचा महान जाणकार आहे.

   तसेच अयोद्देतील राम राज्यभिषेक, प्रसंगावर द्रुष्टांत देऊन वर्णन केले या प्रसंगी कथा सांगतांना ढोक महाराज यांनी लक्ष्मणाला लागलेली शक्ती, अंगद ऋषीने रावणा कडे जाऊन केलेली शिष्टाई, राम रावणाचे युद्ध, रामाचा अयोध्या नगरीत प्रवेश आणि भरत भेट यांचे सुदर वर्णन केले प्रभु दर्शनाची व्याख्या सांगतांना ढोक महाराज म्हणाले की काही लोक नामस्मरणाच्या माध्यमातुन तपस्या करतात त्यांना देवाची अनुभुती होते. काही लोक देवासाठी तर काही लोक संसारासाठी तपस्या करतात भरत हा प्रभु दर्शनासाठी व्याकुळ झाला होता याचा द्रुष्टांत देऊन भक्तजणांना ढोक महाराजांनी मंत्रमुग्ध केले.अनुभवी माणसाचे ऐकले पाहीजे.चुकझाली असेलतर मान्य करा संसारात सुख नांदेल लोकांत बिगडला तरी एकांत शाबूत ठेवा एकांत बिगडला तर समाधान मिळणार नाही आणि समाधान नसेल तर त्याच्या सारखे दु:ख कोनतेच नाही धर्म, संस्कार जपा, अहंकार बाळगु नका,आपल्या जीवनात वेळातवेळ काढून प्रभुरामाचा नामस्मरण करा असा उपदेश ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी कथेच्या सांगता समारोप प्रसंगी केला.
    यावेळी ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी रामकथेच्या उत्कृष्ट आयोजना बद्दल मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या तमेच मा. आ. जेथलिया यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कथा सांगता वेळी सौ.शीतल प्रवीणकुमार जेथलिया यांनी मनोगत व्यक्त केले.मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हंटले की,राजकरणा बरोबरच समाजकारणाची जोड,धार्मिकतेचे आधीष्ठान यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळते या वरच अशी कार्य पूर्णात्वास जातता असंख्य माता भगिंनीचे आशीर्वाद आणि सहकारी मित्रमंडळ यांचे सहकार्य या बळावरच आज पर्यंतची वाटचाल सुरू असून प्रचंड जनसमुदाय बघून त्यांचा कंठदाटून आला व अश्रु अनावर झाले त्यांनी या प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त केले.    
     कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव,आशाताई आकात,रामेश्वरजी अट्टल येवला,नंदकिशोरजी अट्टल,बाबासाहेब गाडगे,मंगेश डहाळे,इंद्रजीत घनवट,रानेश्वर अन्न नळगे,रमेशजी झवर,राजेश भूजबळ,बाबुराव हिवाळे,राजेश खांडेलवाल,बद्रीभाऊ खवणे,राजुसेठ पोरवाल,राधेश्यामजी मुंदडा,शामजी सोनी,नितिन शिंदे,राजेश मानियर,पांडुरंग काटकर,कैलास भुतेकर,तुकारामजी रूपणार,गोविंद बागडिया,रामचंद्र काळे,माऊली राजबिंडे,लक्ष्मणबापू पवार,भारत चव्हाण,अविनाश शहाणे,विकास झरेकर,दत्ता पवार,दिलीप चव्हाण पा.गोसावी,आंबादास दुगाणे,मिसाळ सर,शामसुंदर काळे,विष्णुकांत सोनी,जनार्धन काळे खडकी,विष्णु चव्हाण,प्रकाश अंभुरे,लक्ष्मण शिंदे,डॉ.केशरखाने,आकाश आकात,जगदीश शर्मा,वसंत काकडे,बागलानी मॅडम,सतीशजी निर्वाळ,यांच्या सह परिसरातील भाविक भक्तांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. या सात दिवासीय रामाकथेचे सूत्र संचालन राजेशजी मंत्री यांनी केले.तदनंतर महाप्रसादाने श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचा समारोप झाला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....