महिलांचा सन्मान करणारे आमचे सरकार - आमदार लोणीकर, राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत

 
जालना प्रतिनिधी समाधान खरात
    शेतकरी महासन्मान निधी योजनेत आता वर्षाला महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना12,000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार असून प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर पडली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 
प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आणी केंद्राचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार असून 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार असून 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नसून राज्य सरकार केवळ 1 रुपयांत पीकविमा घेणार असून 
3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
असल्याचे प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी देवठाणा उसवद मंठा विडोळी पाटोदा ते जिल्हासरहद्द रस्ता 13 किलोमीटर तालुका मंठा जिल्हा जालना रस्त्याची सुधारणा करणे कामाची अंदाजीत किंमत 339 लक्ष रुपये या कामाचा व सभामंडप भूमिपूजन आणी २५१५ योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम उद्घाटन सोहळा आज विडोळी तालुका मंठा जिल्हा जालना येथे संपन्न झाला या वेळी ते बोलत होते.
 पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की आता असून 
3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असून 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ राज्य सरकार देणार असून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले. या करीता 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांनच्या खात्यात जमा होणार आहेत. राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार असून पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करून राज्य सरकार 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे या बरोबर मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तारहोणार असून आता मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च राज्य सरकार करणार.
धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकार ने अर्थ संकल्पात केली असून आघाडी सरकार ने अडीच वर्षात एक रुपये सुद्धा धनगर समाजाच्या विकासाकरिता वापरला नाही.
22 योजनांचे एकत्रिकरण करून मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना राज्य सरकार लवकरच करणार असून 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज धनगर समाजातील तरुणांना उपलब्ध करून देणार आहे. अहमदनगर येथे मुख्यालय असणार असून राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी ची तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पात केली आहे. 
या वेळी मंचावर संदीप गोरे अजय अवचार प्रल्हाद बोराडे सतीश निर्वळ पंजाबराव बोराडे नागेशजी घारे राजेश मोरे कैलाश बोराडे लक्ष्मण अवचार योगेश अवचार दिगंबर आवचार रामकिसन अवचार विठ्ठलराव काळे नारायण गोरे अजिंक्य गोरे गणेश चव्हाण निवासराव देशमुख विठ्ठलराव कदम उद्धवराव बोराडे दिगंबर बोराडे नेवारे साहेब पोलीस निरीक्षक संजय देशमुख उद्धवराव गोंडगे ज्ञानोबा अवचार वामनदादा गोरे सोपान काका अवचार शेषराव नाना गोरे उत्तम दादा गोरे रामजी अण्णा गोरे सखारामजी टोम्पे विष्णू अवचार अंकुश गोरे सयाजी गोरे माऊली गोंडगे राजाभाऊ खराबे कैलास चव्हाण सतीश खरात विठ्ठल गोंडगे राजाभाऊ गोंडगे हरिभाऊ कोल्हे यांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश