तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण
तळणी प्रतीनीधी रवी पाटील
नववर्षाच्या शुभारभांच्या दिवशी तळणी येथील कुस्ती स्पर्धला जवळपास ७oवर्षाची पंरपरा आहे सुरवातीच्या काळात गावातील शौकीन व परीसरातील कुस्ती शौकीनाचा या स्पर्धत सहभाग असायचा परतू गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तळणी येथे कुस्ती खेळण्यासाठी आवर्जून येत असून दरवर्षी या स्पर्धचे स्वरूप वाढत आहे लाल मातीच्या या खेळाला हिगोली वाशीम परभणी लातूर बुलढाणा जालना छञपती संभाजीनगर पूणे महाराष्ट्राच्या अन्य ग्रामीण भागातून जवळपास एक हजाराच्या वर कुस्ती पहैलवानानी या लाल मातीत हजेरी लावली विषेश बाब म्हणजे लाल मातीच्या कुस्तीसाठी दहा ते पंधरा मुलीनी कुस्तीचा आनंद घेतला
गेल्या अनेक वर्षाची पंरपंरा असलेल्या स्पर्धला गावातुन वर्गनी जमा केल्या जाते व अनेक मान्यवराकडून स्वंतञ बंक्षीसाची खैरात या वेळी करण्यात आली वय वर्ष दहा ते चाळीस पचेचाळीस वयाच्या पहैलवानाच्या कुस्त्या मोठ्या उत्साहात पार पाडल्या तीनशे रुपयापासुन ते पचवीस हजाराच्या बक्षीसाची लयलूट करण्यात आली
या स्पर्धसाठी महाराष्ट्र केसरी ९२ किलो वजन गटातील विलास कापसे व झानेश्वर जाधव याची उपस्थीती दर्शवून खेळाडूचे मनोधर्य उंचावले
यावेळी वैष्णवी सोळके या मुलीने योगाचे प्रात्यक्षीक करून दाखवले तर एका अंध शे खालेफ पठाण मालेगाव पहैलवानाने सुधा या स्पर्धत सहभाग नोदवला
आकर्षन
महाराष्ट्रातील जवळा बाजार येथील प्रसीध्द निवेदक भालचद्र रणशूर यानी या कुस्ती स्पर्धचे पूर्णवेळ समालोचन करून उपस्थीतांची मने जिंकली या वर्षीच्या कुस्ती स्पर्धचे हे विषेश आकर्ष न ठरले या कुस्ती स्पर्धसाठी मंठा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला
या स्पर्धसाठी ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग अण्णा जनकवार सुभाष सरकटे बबन येऊल रमेश गते मंत्री सरकटे कैलास येऊल सर्जराव सरकटे छगन मामा खरात पैहलवान शुभम गते संतोष येऊल व तळणी ग्रामस्थानी या स्पर्धसाठी आदीनी या स्पर्धसाठी परिश्रम घेतले
ग्रामीण भागातील मर्दानी लाल मातीच्या खेळाला मोठा प्रतिसाद सध्या मिळत यामुळे ग्रामीण भागात सुध्दा मोठे पैहलवान तयार होत आहे गादी स्पर्धा असो की लाल मातीतील खुली कुस्ती स्पर्धा असो या साठी ग्रामीण भागातुन मोठे खेळाडू कुस्तीसह अन्य खेळाच्या प्रकारात चमकत असल्याची प्रतिक्रीया तळणी सरपंच गौतम सदावर्ते यानी दिली
यावेळी वैयक्तीक एकविस हजाराचे बक्षीस गौतम सदावर्त यानी कुस्ती पटू ना दिले