शासकीय गुत्तेदार एम.पी. पवार यांचा मृतदेह घानेवाडी जलाशयात आढळल्याने खळबळ
जालना प्रतिनिधी समाधान खरात
जालना नगर पालिका क्षेत्रात गुत्तेदारी करणारे नामांकित शासकीय गुत्तेदार एम. पी. उर्फ मधुकर परशुराम पवार (वय 51) हे काल, मंगळवारी (दि. १४) सांयकाळपासून त्यांच्या जुन्या जालन्यातील समर्थनगर येथील राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाले होते
यासंदर्भात त्यांचे भाऊ रामेश्वर पवार यांनी कदीम जालना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मिसिंगची नोंद करण्यात आली नातेवाईक आणि पोलिसांनी रात्रीपासून एम. पी. पवार यांचा शोध सुरू केला होता परंतु आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घानेवाडी येथील जलाशयात काही नागरिकांना एक मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनास्थळी चंदनझिरा पोलिसांनी तातडीने भेट देऊन, मृतदेह नागरिकांच्या मदतीने जलाशयातून बाहेर काढला पवार हे गायब असल्याची फोटोसह माहिती सकाळपासून सर्व समाजमाध्यमावर फिरत होती._पवार यांचा फोटो मृतदेहाशी मिळताजुळता असल्याने मृतदेहाची ओळख पटली._
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे
घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसारल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.