श्री समर्थ माध्य. विद्यालयात मुलींना मोफत सायकल वाटप.


 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकल चे वितरण करण्यात.
दरम्यान मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनीसांगीतले की , शासनाची ही अत्यंत महत्वाकांशी योजना असुन. शाळेपासुन तिन किलोमीटर अंतरावरुन पायी चालत येणार्या मुलींना या योजणे अंतर्गत मोफत सायकल दिल्या जाते. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी या योजणेचा खुप फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले . शासनाकडुन मोफत सायकल मिळाल्यामुळे पायी चालत येण्याचे श्रम वाचतात व मुली दररोज ऊत्साहाने शाळेत ऊपस्थीत राहतात तसेच मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन केले.
     गटसाधन केंद्र परतुर चे गटशिक्षणाधीकारी श्री साबळे साहेब , गट समन्वयक श्री कल्याणराव बागल , श्री काटमोडेसाहेब , केंद्रप्रमुख श्री थोटे सर यांनी सायकल प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले.
    समर्थ शिक्षण प्रसारक' अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांनी सर्व मुलींचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....