मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झालेल्या सभा मंडपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन


 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या परतुर येथील गाव भागातील राम गल्ली व बागल गल्ली येथील सभा मंडपाचे उद्घाटन राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी भाजप युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, नगरसेवक संदीप बाहेकर ,प्रकाश चव्हाण ,कृष्णा आरगडे, भगवानराव मोरे ,डॉ.संजय पुरी अंकुशराव बागल, श्रीराम राठोड, अशोक मसलकर, एँड अभय जवळेकर ,प्रकाश दीक्षित, बालाजी सांगुळे ,गोविंद सातोणकर, लक्ष्मणराव पवार, सोनू अग्रवाल, शत्रुघन कणसे, लक्ष्मीकांत कवडी ,रितेश अग्रवाल, अशोक उबाळे ,कल्याण बागल, वैजनाथ बागल, शेषराव बागल ,विठ्ठल कुलकर्णी ,खंडू कुलकर्णी,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल सुरूंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, शिवाजी तरवटे, अविनाश कापसे,राजेभाऊ मुळे,मधुकर निलेवाड, विष्णू जगताप व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड