मराठावाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्य विविध उपक्रम
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
निजामाच्या राजवटीतुन मराठवाडा मुक्त अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती दिली तेव्हा निजामाच्या तावडीतुन आपली सुटका झाली त्या गोष्टीला यावर्षी 75 वर्ष पुर्ण होत आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती परतुर तर्फे वर्षभर विविध कार्यक्रम,उपक्रम सुरु आहेत.परतुर - मंठा तालुका आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम यांच अतुट नात आहे.या चळवळीसाठी परतुर येथे बैठक होवुन अनेक स्वातंत्र्यवीरांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व हौतात्म पत्करले याचे स्मरण म्हणुन या वीरांना अभिवादनाचा कार्यक्रम 26 मार्च 2023 रोजी जि.प.प्रशाला येथे सायंकाळी 5.00 होणार आहे तसेच 17 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येक महिन्यात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी जास्तीत देशभक्त नागरीकांनी,माता-भगिनी,विद्यार्थी मित्रांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहान अमृत महोत्सव समितीचे श्री.प्रकाश काका दिक्षीत,डाँ.भानुदासजी कदम,विठ्ठल कुलकर्णी,अर्जुन जगताप,सचिन काटे,विकास पवार,योगेश दहिवाळ,गजानन मस्के,राहुल मोरे,कुणाल बन्सिले यांनी केले आहे.