जालनेकरांनी राम नवमी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी- राम अवघड़




जालना प्रतिनिधी समाधान खरात 
येत्या 29 मार्च आणि 30 मार्च रोजी जालना शहरात प्रभू श्री राम नमवी निम्मित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत.
यात 29 मार्च रोजी अंबड चौफुली येथे स्थानिक मित्र मंडळातर्फे भव्य महारतीचे आयोजन करण्यात आले असून जालना शहरात प्रथमच भव्य 11 फुटी श्री राम यांची पिओपी पासून बनवलेली मूर्ती तसेच लेजर लाईट अँड साऊंड विशेष आकर्षण असणार आहे.
तसेच येत्या 30 मार्च रोजी राम नमवीच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता चंदनझिरा ते श्री राम मंदिर बडी सडक भव्य मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता गांधी चमन ते श्री राम मंदिर बडी सडक भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीत लेझिम पथक, भजनी मंडळ, मल्लखांब इत्यादी विशेष आकर्षण असणार आहे.
तरी जास्तीत जास्त जालनेकर श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात