नवीन वाद निर्माण होण्या पूर्वीच;प्रशासनाने उढ्ढाण पुलावरी झेंड काढले
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील आष्टी वलखेड घनसांवगी तालुक्यातील पारडगांव कंडारी आसे अनेक गांवाना नेहमीच रेल्वेगेट चा त्रास होत होता मतदार संघाला लोणीकर यांच्या माध्यमातून मंत्री पद मिळाले आणि या रेल्वे गेटवर लोणीकर यांनी उढाण पूला करीता प्रयन्त केले आणि उढाण पूल तयार झाला व नुकतेच आ.बबनराव लोणीकर याच्या हस्ते लोकार्पन सोहळा झाला व उढाण पूला वरून रहदारी सुरु झाली उढाण पूल याला वेगवेगळ्या महामनावाची नावे देण्याकरीता वीवीध निवेदन देण्यात आले हे इतक्या वरच न थांबता या पुलावर विविध रंगाचे झेंडे लावल्याने प्रशासनासमोर नवीनच प्रश्न निर्माण झाला होता. हया झेंड्या मुळे भवीष्यात नवीनच वाद निर्माण होऊ नये म्हणून शेवटी नगरपालिका ,पोलीस,महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली व झेंडे हटवून पोलिसात गुन्हा दाखल झाला. या पुलावर वाहतूक सुरू झाल्याचा आनंद वाहनचालक घेत असतांनाच पुलावर विविध रंगाचे झेंडे ऐन रस्त्याच्या मध्यभागी रात्रीतून कोणतीही परवानगी न घेता लावण्याचे काम झाल्याने पुलावर या झेंड्याचा अडथळा निर्माण झाला होता. हे सर्व झेंडे लावण्याचे काम बुधवार व गुरुवारच्या रात्री दरम्यान झाले. गुरुवारी ही बाब वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी याची सूचना नगरपालिका,पोलीस महसूल प्रशासनाला दिल्याने गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास मोठ्या पोलीस फाट्या च्या उपस्थितीत हे सर्व झेंडे हटवण्यात आले.नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक रवी सुधाकर देशपांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात परतूर पोलिसात कलम २८३ भादवी सह कलम ३,४ महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम,कलम ३ महाराष्ट्र प्रॉपर्टी डामेज ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कमलाकर अंभोरे करत आहेत.या कारवाईनंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असून पुलाजवळ सुद्धा अतिरिक्त पोलीस तैनात केले आहे