जालना शहरातील पुरातन म्हसोबा मंदीर बांधकामाचे भूमिपुजन उद्योजक सचिन मिसाळ यांच्या हस्ते संपन्न

जालना प्रतिनीधी समाधान खरात
शहरातील नळगल्ली भागात असलेले पुरातन म्हसोबा मंदीर बांधकामाचे भूमिपुजन उद्योजक सचिन मिसाळ यांच्या हस्ते शुक्रवार (दि १७) रोजी पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक जगदिश केवलराम प्रित्यानी व माजी नगरसेवक राजु सरोदे, माजी नगरसेवक संजय भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. नळगल्ली येथील पुरातन असलेले म्हसोबा मंदीराचे वेगळे महत्त्व सांगितल्या जाते. 
  मुल बाळ होत नसलेल्यांवर या देवतेच्या कृपा आशिर्वादाने संतानप्राप्ती होते अशी धारणा असल्यामुळे म्हसोबा मंदिरात दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी नेहेमीच पहायला मिळते. या मंदिराकडे शासनासह शहरातील पालिकेनेही दुर्लक्ष केले. त्यामुळे नळगल्ली परिसरासह शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन मंदिर बांधकामाचे कार्य हाती घेतले आहे. शुक्रवार (दि १७) रोजी मोठ्या थाटात मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिर बांधकामाचे भूमिपुजन संपन्न झाले. उपस्थितांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भानुदास मिसाळ, सुनील नंद, संजू दोडके, दुर्गेश दोडके, शुभम घाटेकर, राजू खडके, रामेश्वर पवार, डॉ. कोयाळकर, कचरू घारेगावकर, संतोष दोडके, आनंद झारकंडे विक्की क्षीरसागर, रवि राऊत, सोनू दोडके महेश दोडके, गणेश वनाल आदी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी