देशासाठी प्रानांची आहुती देणाऱ्या परिवाराचे सदस्य राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे दुर्दव्य! काँग्रेसच्या वतीने निषेध निदर्शनात मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी खंत व्यक्त केली.

परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
              देशाच्या सेवेसाठी एक नव्हे तर दोन सदस्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा परिवारातील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे लोकशाहीला घातक असून हे दुर्दवी असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केली. खा.राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारिकीच्या निषेथ करत आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेध निदर्शनात ते बोलत होते. यावेळी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, अन्वर बापू देशमुख, नितीनकुमार जेथलिया, बाळु काका आकात, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, संतोष दिंडे, सादेक बापू देशमुख, निळकंठ तौर,माउली तनपुरे, सुखलालाजी राठोड, एजाज जमीनदार, दादारावजी खोसे,बाळू काका ढवळे, बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके,सचिन लिपने,विकास खुळे, श्रीरंगराव मोगरे,दत्ताकाका तौर, पांडू आबा कुरधने, रुस्तुम राव राजबिंडे, आणिकराव ढवले, उद्धवराव बोनगे, अशोकराव खरात, अर्जुन बरकुले,इंद्रजित डवले, बाळासाहेब भदर्गे,अण्णासाहेब लिपने आदींची उपस्तीती होती. 
मोंढा भागातील काँग्रेस संपर्क कार्यालय परिसरात या निषेध निदर्शनात पुढे बोलताना जेथलिया यांनी लोकशाही घोक्यात असल्याचे म्हणत, जनतेच्या हिताच्या पप्रश्नांबाबत व विशेष देशाच्या अवस्थे बाबत राहुल गांधी यांनी राग व्यक्त करताना जे विधान केले त्याच्या मागील भावनांचा अनुमान घेण्याऐवजी केवळ सत्तेचा गैरवापर करत कायदा समोर करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही लोकशाहीची हत्या असून जर असेच चालू राहिले तर नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या लोकशाही च्या झालेल्या चेष्टेचा काँग्रेस निषेध करत असून सदरील निर्णय मागे घ्यावा व लोकशाहीला पूरक असे सत्ताधाऱ्यांनी वागावे नसता राज्य व देश पातळीवर काँग्रेस नागरिकांना सोबत घेत आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचा इशारा सुरेशकुमार जेथलिया यांनी दिला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड