शेतकरी रेशन कार्ड लाभार्थ्यांना धन्याऐजवजी मिळणार मानधन परतूर:लाभार्थ्यांनी कागदपत्रे रास्त भाव धान्यदुकानदारा कडे जमा करावी-नायब तहसिलदार राजेंद्र धुमाळl



परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये मोठमोठ्या अनेक घोषणांचा सामावेश आहे. त्याचबरोबर आता केशरी रेशनधारक शेतकऱ्यांना मिळणारे धान्य आता बंद होणार असून त्याऐवजी त्यांना थेट पैसे मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.
यामुळे विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिली जाणार आहे. त्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर पैसे दिले जाणार आहेत.
रेशनऐवजी आता मिळणार थेट पैसेया शेतकऱ्यांना केशरी रेशनधारकांना आता थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.प्रति लाभार्थीं कुटूंब प्रमुखाला महिन्याला १५० प्रतीवर्षी १८०० रूपये थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार येणार आहेत.
केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
यामुळे शेतकरी रेशन लाभार्थ्यांनी सात बारा,बँक पासबुक, आधार कार्ड जवळच्या रेशन दुकानात जमा करण्याचे आव्हान नायब तहसिलदार राजेंद्र धुमाळ यांनी केले आहे.

याआधी केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना प्राधान्य गटातील कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे दरमहा प्रती सदस्य 5 किलो अन्नधान्य, ज्यात 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देण्यात येत होते.
यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र सरकारच्या योजनेअंर्तगत करण्यात येत होती.
पण आता या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचं भारतीय अन्न महामंडळाला राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्यासाठीची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....