तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
  तळणी महात्मा फुले सा. वाचनालय तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित गावचे सरपंच गौतम सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सरकटे, जयदेव मुर्तडकर,कृष्णा सरकटे, कृष्णा वाघमोडे, ज्ञानेश्वर काजळे,नंदु सरकटे माविम चे लेखापाल सतिश सरकटे व वाचक वर्ग. मोठया प्रमाणात उपस्थीत होता
    या जयंती निमीत्य सरपंच सदावर्ते यानी मनोगत व्यक्त करताना सागीतले आपल्या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात कर्तृत्वाने मोठी असणारे माणसे जन्माला आली आपल्या पिढीसाठी त्या काळी त्याचा मोठा सघर्ष केला म्हणून ईतिहासाने त्याची नोद घेतली फुले दाम्पत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य एक आदर्श घेणारे आहे .सद्य स्थीतीत कुठल्याही संताना राष्ट्रपूरुषाना जाती पूरते बघण्याची सकूंचीत प्रवूती वाढत चालली असली तरी त्या महापूरुषाचा तो काळ जातीपूरता नसल्याने त्याचे कार्य कधीही नजरेआड होऊ शकत नाही महापूरुषांचा आदर्शच घ्यायचा असेल तर त्यानी केलेला त्याग व त्याचे विचार आत्मसात करावी लागतील महापूरुषानी सगळ्यांचा विचार करुनच ती जगली आहेत त्याचा समर्पण भाव आजच्या पिढीसाठी एक मोठा आदर्श असुन तो आदर्श प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सरपचं गौतम सदावर्ते यांनी सागीतले या क्रार्यक्रमाचे प्रास्तावीक सुधाकर सरकटे यानी केले तर आभार प्रदर्शन माधवराव सरकटे यानी व्यक्त केले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....