महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू; गोहत्या करणार्‍यांना होईल कठोर शिक्षा ,गो हत्या बंदीची मागणी प्रमुख्याने मारवाडी समाजाने लावून धरली होती - आमदार लोणीकर

जालना प्रतिनिधी समाधान खरात 

 महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍यात आला आहे. राष्ट्राचे महामहीम राष्ट्रपती यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे 'गोहत्या' हा दंडनीय अपराध मानला जाणार आहे. गोहत्या करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शिक्षाही होणार आहे. गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍याची मागणी सात‍त्याने राज्यातील मारवाडी समाज करत होता.
1995 साली युती सरकारच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आले होते. मात्र, या विधेयकात काही त्रृटी होत्या. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची शिफारस केंद्राकडून करण्यात आली होती. परंतु, 15 वर्षांच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्यावर काही अभिप्राय सरकारने दिला नाही. मात्र, महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेवर येताच यावर आपला अभिप्राय नोंदवला. याप्रकरणी यांनी दखल घेऊन आज गोवंश हत्या बंदी कायद्यावर स्वाक्षरी केली. असे प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. जालना येथे महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलन व महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मारवाडी समाजाचे नवे महाअधिवेशन आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गुरु गणेश भवन येथील स्वर्गीय हिरालाल सेट अग्रवाल अधिवेशन नगरीत आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जगन्नाथ पुरी येथील जगद्गुरु शंकराचार्य अपेक्षा आनंद महाराज आंतरराष्ट्रीय वक्त्या साध्वी पुष्पाताई शास्त्री हरियाणा केंद्रीय कृषी राज्यमंत्री नामदार कैलासजी चौधरी केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार डॉक्टर भागवत कराड साहेब जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुलजी सावे, खासदार गजानन कीर्तिकर अखिल भारतीय मारवाडी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद प्रसाद गडोदिया अखिल भारतीय मारवाडी युवा मंच राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टड आमदार प्रशांत बंब शिवकुमार लोहिया आमदार नारायण कुचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर जयप्रकाश मुंदडा रमेशचंद्र बंग उमेश पंचरिया घनश्याम शेठ गोयल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार डॉक्टर भागवत कराड यांच्या शुभहस्ते या खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न झाले.
 यावेळी पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचा कारभार कॅबिनेट मंत्री म्हणून आपण पाहत असताना जालना जिल्ह्याचे पालकत्व त्याकडे होतं त्यावेळी मारवाडी समाजाच्या शिष्टमंडळाने भेटून गुरु गणेश भाऊनाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. त्यावेळी मी तातडीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी लावून धरली आणि गुरु गणेश भवना च्या विकासासाठी तीन कोटी 80 लक्ष रुपये निधी मंजूर करून दिला. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी वीरेंद्र जी धोका सत्यनारायण भारुका अग्र विभूषण सुभाषचंद्र देविदान सुनील बियाणी मनीष तवरावला यांनी विशेष प्रयत्न केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड