माविम मार्फत परतूर तालुकास्तरीय सुधारक सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 महिला आर्थिक विकास महामंडळ जि. जालना मार्फत
तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्र परतूर, आणि सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र,आष्टी ता परतूर जि. जालना येथे नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत Gender & Nutrition उप घटकाच्या अमलबजावणी साठी Gender Sensitive Role Model Award म्हणून तालुकास्तरीय सुधारक सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. महिलांच्या विकासा करिता उल्लेखनिय कार्य व विशेष सहकार्य केल्या बद्दल पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले 
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाला सोबतच सी एम आर सी व्यवस्थापक यांचे मार्फत प्रास्ताविक व माविम च्या कामाची माहिती देण्यात आली तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांचे स्वागत सी एम आर सी व्यवस्थापक व स्टाफ मार्फत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना सहकार्य करणारे किंवा गाव स्तरावरील महिलांना मदत करणारे तालुक्यातील 60 गावातील निवड करण्यात आलेल्या 55 पुरुषांना सुधारक सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला तालुकास्तरीय निवड समिती सदस्य, पोलिस निरीक्षक श्री श्याम सुंदर कोठाळे,पंचायत समिती येथील ग्राम विकास अधिकारी श्री दडमल सर ग्राम सेवक श्री जमधाडे सर श्रीमती मंदा ताई लोणीकर मॅडम अर्चना तनपुरे मॅडम, माविम जिल्हा कार्यालय द्वारे मा. जिल्हा समन्वय अधिकारी मा. उमेश कहाते, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी, नेमाने मॅडम, उपजीविका विकास अधिकारी प्रविणकुमार कथे माविम मित्र मंडळ, CMRC पदाधिकारी व स्टाफ, सामजिक कार्यकर्ते, पत्रकार इत्यादि उपस्थित होते सोबतच 60 गावातील 275 महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी लोक संचालीत केंद्राचे व्यवस्थापक शैलेश उखळकर सुषमा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व माविम बाबत माहिती दिली यामधे लेखापाल अर्जुन लाहे जुबेर शेख सहयोगिनी मंगल साकळकर, मनिषा कुलकर्णी, खरात ताई अस्विनी गंगने सीमा नाईक, दहिभातेताई, ढोकेताई व सर्व सी एम आर सी कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी यावेळी सर्वानी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश