परतूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   परतूर येथील लिंगायत समाजाच्या वतीने दि 22 महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी  दुचाकी फेरी काढण्यात आली.
    सर्वप्रथम महात्मा बसवेश्वर चौकात सर्व समाज बांधवाने जमा होत ध्वजारोहण करत सिद्धलिंग विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज संस्थान आष्टी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर चौकाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मा. आ.सुरेश जेथलिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष कपिल आकात, मा. नगराध्यक्ष विनायक काळे, विजय राखे, अंकुश तेलगड ,आष्टी येथील ग्रामपंचायत सदस्य बबलू सातपुते, वाटूर चे सरपंच गजानन केशरखाने, मा. नगरसेवक शिवा बल्लमखाने,बबनराव उन्मुखे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महात्मा बसवेश्वर चौकातून रामेश्वर मंदिर पर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष ओम कानडे,उपाध्यक्ष संजय देशमाने,नंदकिशोर बल्लमखाने,सचिव महालिंग स्वामी,अंकुश आवटे, कोषा अध्यक्ष सुरेश दसमले,रमाकांत बरीदे, सोमनाथ पांगरकर,बबनराव उन्मुखे, सोनाप्पा धारूरकर,वैजनाथ ढबे,अमोल हरजुळे, सुदर्शन पांगरकर,शिवा स्वामी, गणेश स्वामी, किसनराव बरीदे, महारुद्र स्वामी,भारत आवटे, गणेश हनवते,बाळू केशरखाने, बाळू धारूरकर, दत्ता अप्पा हालगे,शिवा अप्पा साखरे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत