व्हॉइस ऑफ मीडियाच्या परतूर तालुका कार्यकारिणी जाहीर,अध्यक्षपदी पत्रकार भारत सवने , सरचिटणीस सागर काजळे तर कार्याध्यक्ष रामप्रसाद नवल
जालना प्रतिनिधी समाधान खरात
व्हॉईस ऑफ मीडिया जालना जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची नियुक्ती जालना जिल्हा अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी जाहीर केली आहे. परतुर तालुका अध्यक्षपदी पत्रकार भारत सवने, तर तालुका सरचिटणीसपदी सागर काजळे, तर तालुका कार्याध्यक्ष म्हणून रामप्रसाद नवल यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे व सरचिटणीस राजेश भालेराव यांनी जाहीर केली आहे. पुढील कार्यकारणी सहसरचिटणीस हारूण कच्छी आष्टी, उपाध्यक्ष आशीष धुमाळ, अशोक दहिभाते, कोषाध्यक्ष एम.एल कुरेशी,
कार्यवाहक सरफराज नाईकवाडी, संघटक केदार शर्मा, प्रसिद्धी प्रमुख राजकुमार भारुका, सदस्य राजेश नाईक, राहुल औटे आष्टी, सल्लागार मोहन सोळंके, अर्जुन पाडेवर, आशीष गारकर, अजय देसाई, शाम सोनी, उद्धव डोळस, एकनाथ राऊत, कैलाश भदर्गे, तारेख शेख, मुमताज अंसारी, आदींचा समावेश आहे.