श्रध्देविना धर्माची व्याखा अधूरी आहे मनुष्याला श्रध्दा असेल तरच तो सत्संगात येईल -आनंद चैतन्य महाराज

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
     मंठा तालूक्यातील माळेगाव येथे प पू राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य श्री आंनद चैतन्य महाराज यांच्या तीन दिवशीय गीता रामायण सत्संगा चे आयोजन माधव भाऊ चव्हाण व माळेगाव ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले जागतीक बंजारा दिवस व हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्याने भव्य नियोजन हे ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्रातील चैतन्य साधक परिवाराची मोठी उपस्थीती या सत्संगाला होती प्रारंभी आज भव्य शोभायात्रा काढण्यात आल्याने वातावरणात प्रसन्नता आली

श्रध्देविना धर्माची व्याखा अधूरी आहे मनुष्याला श्रध्दा असेल तरच तो सत्संगात येईल ना सत्संगाचे ज्याच्याबर संस्कार झाले तो श्रध्दावान होणारच जो श्रध्दावान झाला की धर्माचे पण रक्षण होणारच 


मनुष्याने श्रद्धावान असले पाहीजे त्याची साधना असली पाहीजे चौदाशे वर्षाचे आयुष्य असणाऱ्या चांगदेवाकडे अहकांर होता त्याच्या कडे श्रध्दा नसल्याने तो चांगदेव कोराच राहीला या उलट चौदा वर्षाची मुक्ताबाई श्रध्दावान ही होती आणि ज्ञानवान पण होती . तिच्या श्रध्दे पूढे चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची तपश्चर्या कमी पडली आजच्या युगात मनुष्याला खरी गरज आहे ती सत्संगांची तोच सत्संग मनुष्य जीवनाचा उध्दार केल्याशिवाय राहनार सद्यस्थितीत मनुष्य पैश्यासाठी कुठल्याही स्थरावर जात आहे पैश्याच्या मोहापूढे त्याला देश देव धर्म या गोष्टीचा विसर पडला आहे मनुष्याच्या आयुष्यातील आर्थिक सपंती ही त्याच्या उद्धाराचे साधन बनू शकत नाही मनुष्याला उध्दारच करायचा असेल तर त्याला श्रध्दावान असले तर पाहीजे व त्याने सत्संगाची कास धरणे गरजेचे आहे तरच या कलयुगात त्याचा उध्दार शक्य आहे मनुष्याने हे लक्षात ठेवले पाहीजे त्याची सुरवात ही शून्याने होते आणि शेवट ही शून्याने मिळालेले आयुष्य दोनही शून्याच्या मध्ये जगायचे असते त्या वेळेत त्याने त्याच्या पूण्याचा संचय वाढवणे गरजेचे असते तो सचंय वाढवण्याचे ठिकाण जर कोणते असेल तर तो सत्संग परमेश्वराने दिलेली ती संधी मनुष्याच्या उध्दाराची संधी असते त्या संधीचे सोने करणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे 

तीन दिवशीय या सत्संगाला मातृशक्तीची मोठी उपस्थीती होती मातृशक्तीबद्दल बोलताना बापूजी नी गौरव दगार काढले आदीशक्तीचे विराट दर्शन या संत्सगात झाले मातृशक्तीमुळेच तुमचे आमचे अस्तीत्व टिकून आहे 

मनुष्याच्या जीवनात गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंतीचा उन्माद सुध्दा होता कामा नये मनुष्याने स्वःतच्या मर्यादा ओळखून राहीले पाहीजे तरच त्याची पथ राहत असते ज्याला मर्यादा ओळखून वावरता आले त्याला ज्ञानी समजावे 

सांसारिक आयुष्यात प्रकृती संस्कृती आणी विकृती या तीन गोष्टीचा वावर आहे दुसर्या ना देने वाटून खाणे ही आपली संस्कृती आहे दोघांना मिळणे व ते समानतेने वाटून घेणे ही प्रकृती झाली पंरतू आपल्या जवळ असून ते इतराना न देने उलट त्याचा आणखी संचय करणे म्हणजे विकृती आहे ती विकृती मनुष्यासाठी घातक आहे

देवाच्या दुकानात सगळ्याची खाते आहेत त्या खात्यात पाप पूण्याचा सगळा हिशोब त्या खात्यात जमा होत असतो मग त्या खात्यामध्ये पाप टाकायचे की पूण्य हे ज्याच त्याने ठरवावे त्या खात्यावर पुण्याचा संचय वाढवायचा असेल तर सत्संगाची कास धरावीच लागेल तरच त्याचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही 

शनिवारी या सत्संगाचा समारोप होणार आहे समारोपासाठी महाराष्ट्र शासनाचे मञी संजय राठोड जालन्याचे .पालकमंञी अतूल सावे याची उपस्थीती राहणार आहे आज माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया यानी सत्संगाचा लाभ घेतला 

या सत्संगाच्या यशस्वीतेसाठी माळेगाव येथील ग्रामस्थ परीश्रम घेत आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.