तळणी परीसरात गारपीटीने कांदा पिकाचे व उन्हाळी भाजीपाल्याचे अतोनात नुकसान

तळणी .. प्रतिनिधी ( रवि पाटील ) 
    तळणी परीसरातील तळणी कानडी उस्वद लिबंखेडा कोकंरबा वडगाव ( स ) शिरपूर इंचा टाकळखोपा वाघाळा दुधा सासखेडा आदी गावात गारपीटीने कांदा पिकाचे व उन्हाळी भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे ऐन भरात आलेल्या कांदा या पिकांचे लाखोच्या घरात नुकसान झाले विविध कंपन्या सोबत करार करून शेतकर्यानी उन्हाळी कांदा पिकाचे उत्पादन जोमात घेतले होते तळणी परिसरातील जवळपास पंधरा गांवात अनेक शेतकर्यानी कांदा उत्पादन घेण्यासाठी मोठी मेहनत केली सपूर्ण एप्रिल महिन्यात कमी अधिक प्रमाणात बेमोसमी पावसाची हजेरी तळणी परीसरात लागतच होती पंरतूं . काल वार गुरूवार रोजी संध्यांकाळी पाच वाजलेल्या सुमारास तुफान पावसाला सुरवात झाली पाऊस पडल्यानंतर तुफान गारांचा तंडाखा बसल्याने कांदा भाजीपाला व उशीरा पेरलेली ज्वारी भुईसपाट झाली

पावसाळ्यात ज्या प्रमाणे पाऊस पडतो त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या विषेश करुन पूर्णा नदी पाञाच्या काठावरील अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात पंरतू काल झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकर्याना भाजीपाला तळणी बाजारात विक्री साठी उपलब्ध करता आला नसल्याने आज भाजीपाल्याची आवक मंदावली 

सध्या मंठा कृषी उत्पत्न बाजार समितीची निवडणूकीची रणधूमाळी सुरू असून प्रचारा दरम्यान मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर तळणी येथे आले असताच विजेच्या कडकडाटसह मोठया प्रमाणात गारपीटीला सुरवात झाल्याने लोणीकरांना मंदीराचा सहारा घेतला तेथूनच त्यानी तहसीलदार व इतर यञणेला नुकसानीच्या सदर्भात पंचनामे करण्याच्या सुचना त्यानी दिल्या 

कानडी येथील केशव खंदारे यांच्या शेतातील उकडलेली हळद पूर्णपणे बेमोसमी पावसाने भिजून नुकसान झाले

दोन एकरवरील कांदा काढणीला आला होता एक लाख रुपयांचा लाव गाडीचा खर्च त्यावर करण्यात आला होता कंपनी च्या करारानुसार दोन ते अडीच लाख रुपयाचे उत्पादन त्यातुन मिळाले असते गारपीटीने सर्व हिरावून नेले
गोविंद दतराव देशमुख शेतकरी देवठाणा 

तळणी सह दहा पंधरा गावात गारपीट झाली असून नुकसानी सदर्भात जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री याना भेटून शेतकर्याच्या नुकसानी सदर्भात भरपाई मिळावी अशी मागणी करणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगीतले

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.