दिंडी महामार्गावर असलेल्या गोदावरी नदीवरील एक किलोमीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार,आमदार लोणीकरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी द्वारे सरकारचे लक्ष वेधल्याने प्रत्यक्षात पुलाच्या कामास सुरुवात
जालना प्रतिनिधी समाधान खरात
परतूर मतदारसंघात ९५ किलोमीटर लांबी असलेला शेगाव पंढरपूर दिंडी 'राष्ट्रीय महामार्ग खामगाव-लोणार -तळणी-मंठा -वाटूर-परतूर-लोणी-आष्टी-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या ४३० किलोमीटरच्या रस्त्याच्या कामातील बीड व जालना या दोन जिल्ह्याच्या हद्दीतील रस्त्याचे व पुलाचे बांधकाम मेघा इंजीनियरिंग व इन्फ्रा कंपनी हैदराबाद या कंपनी ला देण्यात होते. या कंपनी ने रस्त्याचे काम पूर्ण करून गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे सोडून दिले होते.
रस्त्याचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष उलटले असले तरीही गोदावरी नदीवरील पुलाचे काम सुरू होत नव्हते. नदी तीरावरील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे कारण कंपनी पुढे करत होती. या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे अविरत प्रयत्न करीत होते. याबाबतीत आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्षात भेटून व निवेदनाद्वारे या पुलाच बांधकाम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत असताना गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या सावंगी गंगा या गावातील संबंधित शेतकरी कृष्णा लक्ष्मण टेकाळे आणि अशोकराव वाकणकर यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांना या पुलाच्या कामाकरिता जमीन देण्याची विनंती केली होती. शेतकरी जमीन देत आहे तुम्ही काम सुरू करा अशी विनंती आमदार लोणीकर हे कंपनीला वेळोवेळी करत परंतु ही मेघा इंजीनियरिंग व इन्फ्रा कंपनी हैदराबाद या पुलाच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत होती. कामावरून मशनरीआणी बांधकाम साहित्य ही इतरत्र हलविले होते. या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता काहीही प्रयत्न करीत नव्हते. संबंधित कंपनीला नोटीस ही देत नव्हते किंवा दंडाची रक्कम वाढवतही नव्हते. मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी कंपनीशी संगणमत केले होते रस्त्याचे काम होऊन पाच वर्ष पूर्ण झाली तरीही पुलाचे काम होत नसल्याने. या शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाचा काहीही फायदा होत नव्हता. म्हणून आमदार बबनराव लोणीकर यांनी अत्यंत प्रभावीपणे मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणी लक्षवेधी करून सरकारचे लक्ष वेधत मेघा इंजीनियरिंग व इन्फ्रा कंपनी हैदराबाद आईचे डिपॉझिट असलेली अनामत रक्कम जप्त करून संबंधित मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला कॅबिनेट मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी उत्तर देताना आपण लवकरात लवकर या पुलाच्या कामाला सुरुवात करून गोदावरी नदीवरील एक किलोमीटर लांबीच्या या फुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना तथा आदेश कंपनीला देऊ. सूचना देऊनही कंपनीने काम पूर्ण केले नाही तर कंपनीची अनामत रक्कम जप्त करू. असे आश्वासन आमदार लोणीकर यांना दिले होते. आमदार लोणीकरांनी केलेल्या विशेष प्रयत्नाला यश आले असून या शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील गोदावरी नदीवरील एक किलोमीटर लांबी असलेल्या पुलाचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू झाले असल्यामुळे विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये आणि दरवर्षी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी नागपूर व दिल्ली येथे जाऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांनी केल्याने दोन हजार कोटी रुपये किमत असलेला हा 430 किलोमीटर लांबीचा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला होता.