पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 120 गावांच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 98 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश ,जल जीवन मिशन अंतर्गत सेवली गावासाठी 1 कोटी 61 लाख तर नेर गावासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध- लोणीकर


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
पाणी हेच जीवन असून त्यामुळेच शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रीड पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. जनतेच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही. श्वासात श्वास असेपर्यंत जनसेवा करत राहणार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कधीही राजकारण केलं नसून विकास कामांना प्राधान्य देत काय नीतिमत्तेने राजकारण केलं अधिकाधिक जनतेची सेवा करून निधी उपलब्ध करून दिला. जल जीवन मिशन अंतर्गत सेवली गावासाठी 1 कोटी 61 लाख तर नेर गावासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रीड योजनेअंतर्गत परतूर (176 गावे) 234 कोटी, मंठा (95 गावे) 133 कोटी, परतूर शहर 56 कोटी, मंठा शहर 16 कोटी तर विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी 98 कोटी असे एकूण 537 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून यापुढे देखील गाव वाडी वस्ती तांडा यांच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी उपस्थित त्यांना शब्द दिला.

सेवली व नेर येथे आयोजित 120 गावांच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण तथा जलतुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते. 176 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजना व 95 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजना या दोन्हींमध्ये बरेच जलकुंभ हे कालबाह्य झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यामुळे जवळपास 59 जल कुंभ ही 120 गावे विस्तारीत पाणीपुरवठा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत तसेच गुरुत्ववाहिनी जलकुंभ वितरण व्यवस्था इत्यादी कामांचा पुनर्वसित गावांसह या 120 गावे विस्तारित ग्रेड पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात आला आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली.

120 गावांची विस्तारित पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून जल जीवन मिशन अंतर्गत या योजनेसाठी 98 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये जिल्हा परिषदे कडून वर्ग करण्यात आलेली 23 गावे पुनर्वशीत असणारी पाच गावे परतुर तालुक्यातील दोन्ही ग्रीड मध्ये नसलेली 24 गावे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट झालेली 68 गावे अशी एकूण 120 गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये जालना तालुक्यातील 10 परतूर तालुक्यातील 42 तर मंठा तालुक्यातील 68 गावांचा समावेश आहे असे देखील पुढे बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले.

176 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजना मूळ मंजुरी 234 कोटी रुपयांची असून सदर योजनेचा उद्भव निम्न दुधना प्रकल्प आहे 95 गावांची दुसरी ग्रीड पाणीपुरवठा योजना व त्यामध्ये समाविष्ट गावे या योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता ही 248 कोटी रुपयांची आहे मतदार संघातील संपूर्ण गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रीड पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली होती त्या अंतर्गत प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करण्यात आलं असून ज्या ठिकाणी जलकुंभ नाही त्या ठिकाणी नव्याने जलकुंभ बांधण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर नल हे ब्रीदवाक्य घेऊन गावातील प्रत्येक घरी नळाची कनेक्शन देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे अशी माहिती देखील यावेळी लोणीकर यांनी दिली.

यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव प्रकाश टकले विकास पालवे डॉ शरद पालवे अशोक डोके शेख नावेद हनुमंत उफाड तेजस कुलवंत विक्रम उफाड गजानन उफाड कोमल कुचेरिया दिलीप जोशी शिवराज तळेकर समाधान वाघमारे प्रमोद भालेकर सौरभ माहूरकर राजभाऊ देशमुख गजानन महाजन गणेशराव खैरे प्रकाश इलग नंदकुमार घोडे दिगंबर जायभाई वैजनाथ आप्पा तळेकर रामदास सदावर्ते माऊली शिरसागर अजीम पटेल संजय भालेराव संजय काळे पिराजी मेहत्रे कृष्णा निंबाळकर डॉ मांटे इंदर हिंगे दत्तात्रय नरवडे महादेव काळे नवीन पटेल डॉक्टर रियाज शेख सचिन साकला बापू आकमार माऊली झोरे सुरेश ढाकणे विजय मुंडे रामेश्वर काकडे सुखदेव दराडे रमेश पवार बालासाहेब मुंडे विलास जाधव नारायण मगर कैलास उफाड सोनू कुरेवाड गोविंद खरात अहमद भाई विजय घाडगे सचिन घाडगे राम राठोड संतोष सहाणे गजानन निफाड भास्कर कुलवंत यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री रबडे उप अभियंता श्री गाडे व अभियंता तांत्रिक शाखा श्री गोंडगे प्रोजेक्ट मॅनेजर श्री दर्शनसिंग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड