भूतलावरच्या या भक्ती भावाच्या काल्यात नाहुन निघा तरच सुख तुम्हाला मिळेल- हभप सेवाधारी पौळ बाबा महाराज

तळणी प्रतीनीधी रवी पाटील
तळणी येथील श्री संत नेमिनाथ महाराज यांच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज हरिभक्त हरिभक्त परायण सेवाधारी पौळ बाबायांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली 
गोकूळीच्या सुता अंतपार नाही लेखा 
या अंभगावर निरूपन केले भगवान श्रीकृष्णाने गोकुळात प्रवेश केल्यावर सर्व गोकुळ वासीयाना सुखाचे दिवस आले हे सुख गौळणी गोपीका गोपालाना गाई वासराला मिळाले दोनही दुथडया भरून यमुना वाहु लागली ती सुध्दा आंनंदी झाली भगवताच्या जन्मानंतर सुखाची वाट कैलासापर्यन्न गेली देवाच्या सहवासातील प्रत्येकाले मिळाले हेच सुख जर तुम्हा आम्हाला मिळवायचे असेल तर भूतलावरच्या या भक्ती भावाच्या काल्यात नाहुन निघा तरच ते सुख तुम्हाला मिळेल नाही तर नरक यातना भोगण्यासाठी तुम्ही स्वःत च जबाबदार राहाल असेल प्रतिपादन सेवाधारी पौळ बाबा यानी तळणी येथे केले
   भगवताच्यां बालपणी माता यशोदा व अन्य गोपीकेने भगंवंतांची मनोभावे सेवा केली त्या सेवेमुळे त्याचा उध्दार झाला भगवताचा अवतार ज्याच्या साठी होता सुध्दा खुश होता ज्या वेळेस आकाशवाणी झाली त्यावेळेस कंसांला समजले की आपल्या अधपतनाचा काळ आला आहे त्याच भितीने कंसांने अनेक चुका केल्या गोकुळ निवाशीना ञास देण्याच्या धडाका जरी कंसाने लावला होता जोपर्यन्त त्याच्या पाप कर्माचा घढा भरला गेला नाही तोपर्यन्त भगवंताने आपल्या लिला दाखवल्या नाही 
  ज्या वेळीला देवकीच्या पोटी पहिला मुलगा जन्मला तो वासुदेवाने कसांच्या स्वाधीन केला पंरतू कंसाने मनोमन विचार केला की मला देवकी पासुन होणारे आठवे आपत्य माझा संहार करणार असल्याने वासुदेवाला व देवकीला बंदी करून तीचे सर्व अपत्यांचा वध करण्याचे पाप कंसांने केले असल्यानेच भगवंताला त्याचा वंध करण्यासाठी अवतार घ्यावा लागला तो अवतार पृथ्वीतलावरी सर्वाच्या कल्याण्या साठीचा अवतार ठरला आहे जगाच्या कल्याणासाठीच संताचे अवतार हे होत असतात संतानी दाखवलेल्या भक्तीमार्गावर मनुष्याचे मार्गक्रमण असले पाहीजे तो भगवंत भावाचा भुकेला आहे आपल्या अतकरणातील भाव जर श्रद्धावान असेल तर तो नक्की ऐकतो ज्या भगवांन श्रीकृष्णाच्या बासुरीवर गाई जवळ येत ती भगवतांची असलेल्या श्रध्देमुळेच मनुष्य ही तितकाच श्रद्धावान असला पाहीजे की तो आपल्या हाकेला धावून आला पाहीजे इश्वर प्राप्तीचा खरा मार्ग हा भक्तीचा मार्ग आहे तो तुम्ही स्वीकारला तर उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही


भगवान श्रीकृष्णाने गाईची सेवा केली तीची सेवा तुम्ही आम्ही केली पाहीजे गाईचे सेवा केली तर ती साक्षात भगवंताची सेवा केल्यासारखे आहे तीच्या सेवेची जबाबदारी व रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे तीचा सांभाळ करा असे प्रतीपादन पौळ बाबानी केले 

प्रसादात विविधता 
श्री संत नेमीनाथ महाराज हे पंचक्रोशीतील प्रसीध्द संत असून सर्व जातीधर्माचे लोक येथे नथ मस्तक होतात काल्याच्या प्रसादासाठी आधीच्या दिवशी सपूर्ण गावात पिठाचे वाटप करण्यात येते काल्याच्या दिवशी किर्तन श्रवण करायला येताना या पोळ्या संस्थांनमध्ये जमा करून किर्तनझाल्यावर पंगती बसून वितरण करण्यात येते गेल्या सात दिवसात शिवमहापूराण व किर्तन व धार्मिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल नेमीनाथ महाराज संस्थांन येथे होती मदीर समीती ग्रामस्थ यानी सात दिवस मोठे परीश्रम घेतले दहा हजाराच्या वर भावीकांनी आंनदाने प्रसाद घेतला

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत